Join us  

SL vs IND : Team India चा श्रीलंका दौरा; राहुलचे 'हार्दिक' स्वागत, दोन मालिकांसाठी दोन कर्णधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 6:55 PM

Open in App
1 / 10

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब उंचावला. विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने ट्वेंटी-२० क्रिकेटला निरोप दिला.

2 / 10

रोहितच्या निवृत्तीमुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाची धुरा सांभाळेल हे जवळपास निश्चित आहे.

3 / 10

येत्या २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे.

4 / 10

नुकताच गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्यामुळे श्रीलंका दौरा ही प्रशिक्षक गंभीरची पहिली परीक्षा असेल.

5 / 10

'टाइम्स ऑफ इंडियाने' बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राहुल भारताच्या वन डे संघाचा कर्णधार असेल.

6 / 10

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत वन डे संघाची धुरा सांभाळेल असे कळते.

7 / 10

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. या विश्वचषकासह द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. तर रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

8 / 10

एकूणच श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ दोन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात असेल. खरे तर प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका असेल.

9 / 10

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी काळात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता वन डे मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

10 / 10

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर २७ जुलै, २८ जुलै व ३० जुलै रोजी ट्वेंटी-२० सामने खेळेल. त्यानंतर २ ऑगस्टपासून वन डे मालिकेला सुरुवात होईल आणि त्यातील दुसरा व तिसरा वन डे सामना अनुक्रमे ४ व ७ ऑगस्टला खेळवला जाईल.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीरलोकेश राहुलहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ