Join us  

IND Vs WI 1stT20I : त्यामुळे पहिल्या टी-२०मध्ये टीम इंडियाचं पारडं जड, वनडेनंतर टी-२०मध्येही वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 2:09 PM

Open in App
1 / 6

एकदिवसीय मालिकेत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता टी-२० मालिकेत वर्चस्व राखण्यासाठी सज्ज झाला आहे. आज होणाऱ्या पहिल्या टी-२०मध्येच नाही तर संपूर्ण मालिकेमध्ये भारतीय संघाचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. या सर्वाचं महत्त्वाचं कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-२० सामने ईडन गार्डनमध्ये खेळवले जाणारे आहेत. तसेच हेच कारण नाही तर एकूण पाच कारण आहेत. ज्यामुळे भारतीय संघाचा विजय निश्चित दिसत आहे.

2 / 6

पहिलं कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आतापर्यंत खेळवल्या गेलेल्या १७ टी-२० सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यांत वेस्ट इंडिजला विजय मिळाला आहे. तर १ सामना बरोबरीत राहिला आहे.

3 / 6

दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील भारतीय संघाची कामगिरी. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या ईडन गार्डनवर केवळ एक सामना खेळवला गेला आहे. ज्यामध्ये भारताने विजय मिळवला होता.

4 / 6

भारत आणि वेस्ट इंडिजला क्रमवारीतच्या तागडीमध्ये तोलले असता. यजमान संघाचे पारडे जड दिसत आहे. भारतीय संघ टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिज सातव्या क्रमांकावर आहे.

5 / 6

वेस्ट इंडिजविरोधात जुलै २०१७ पासून डिसेंबर २०१९ दरम्यान, भारतीय संघाने एकूण १० टी-२० सामने खेळले आहेत. त्यामधील ८ सामन्यात बाजी मारली आहे. म्हणजेच गेल्या १० पैकी आठ सामन्यात भारताने वर्चस्व राखले आहे.

6 / 6

रोहित शर्माची कर्णधार म्हणून आकडेवारीही वेस्ट इंडिजची डोकेदुखी वाढवणारी आहे. रोहित शर्माने २२ सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यातील १८ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. रोहित शर्माच्या विजयाची टक्केवारी ८१.८१ टक्के आहे. किमान २० सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये ही टक्केवारी सर्वोत्तम आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ
Open in App