Join us  

IND vs WI: रोहितने दुसऱ्या वन डे सामन्यात करायला हवेत 'हे' ३ बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 4:35 PM

Open in App
1 / 6

Team India Playing XI changes, IND vs WI 2nd ODI: टीम इंडियाने पहिला सामना जिंकत वन डे मालिकेत १-०ची आघाडी घेतली. आज, शनिवारी बार्बाडोसमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेतील दुसरी वनडे रंगणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने विंडिजचा पाच गडी राखून पराभव केला.

2 / 6

फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने वेस्ट इंडिजचा डाव केवळ 114 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात, भारताने हे आव्हान 22.5 षटकांत पूर्ण केले. आज भारत मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

3 / 6

भारतीय संघ व्यवस्थापनाने वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमात थोडा प्रयोग केला होता. या मालिकेत चाहत्यांना भारतीय लाइन-अपमध्ये आणखी काही बदल पाहायला मिळतील असा तो संकेत होता. त्यानुसार आजच्या सामन्यासाठी संघातही तीन बदल पाहायला मिळू शकतात.

4 / 6

सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसन- सूर्याला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये अनेक संधी मिळाल्या आहेत, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. पहिल्या सामन्यात सू्र्याला 25 चेंडूत 19 धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्या जागी सॅमसनला संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो.

5 / 6

उमरानची जास्त षटके- उमरान मलिक सध्या वर्ल्ड कपच्या संघासाठी झगडतोय. पहिल्या सामन्यात रोहितने त्याला तीन षटके दिली. त्यात एकही विकेट न घेता १७ धावा दिल्या. मलिकला पुरेशी षटके टाकायला मिळायला हवीत. त्याला जास्त संधी मिळाली, तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल.

6 / 6

मुकेशच्या जागी उनाडकटने ओपनिंग बॉलर- मुकेश कुमारला हार्दिकसोबत ओपनिंग बॉलिंग दिली होती. पण भारताने जयदेव उनाडकटच्या रूपाने डावखुरा वेगवान गोलंदाज वापरण्याचा विचार केला पाहिजे. मुकेश कुमार आशियाई खेळांच्या संघात आहे, म्हणजे तो वर्ल्ड कपचा भाग नाही. अशा वेळी या पर्याय वापरायला हवा.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादवसंजू सॅमसनकुलदीप यादवहार्दिक पांड्या
Open in App