Join us  

IND vs WI, 2nd T20I Live Update : लय भारी!; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानचा वर्ल्ड रिकॉर्ड मोडण्याच्या दिशेनं वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:22 PM

Open in App
1 / 8

हर्षलने १८व्या षटकात ८ धावा दिल्या, त्यानंतर भुवीनं १९ व्या षटकात फक्त ४ धावा देत १ विकेट घेतली. तिथेच विंडीजच्या हातून सामना निसटला आणि भारताने ८ धावांनी विजय मिळवला. भारतासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला.

2 / 8

रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. त्यानंतर रिषभने वेंकटेश अय्यरला सोबत घेऊन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

3 / 8

विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित व विराट यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने २४ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट घेत भारताला धक्के दिले.

4 / 8

प्रत्युत्तरात विंडीजला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कायले मेयर्स ( ९) व ब्रेंडन किंग ( २२) झटपट माघारी परतले. पण, निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी शतकी भागीदारी करून विंडीजला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. विंडीजला ३६ चेंडूंत ७२ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ८ विकेट्स होत्या. पूरन व पॉवेल यांनी ६२ चेंडूंत शतकी भागीदारी केली.

5 / 8

१९व्या षटकात भुवीने ही भागीदारी तोडली. पूरन ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला. भुवीने १९ व्या षटकात ४ धावा देताना १ विकेट घेतली अन् सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला. हर्षलने अखेरच्या षटकात १६ धावा दिल्या. पॉवेल ३६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला.

6 / 8

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताने सलग ८ सामने जिंकून स्वतःचाच ७ सामन्यांचा ( डिसेंबर २०१२ ते एप्रिल २०१४) विक्रम मोडला. आता भारताला जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये नोंदवलेला सलग ९ विजयाचा विक्रम खुणावत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा हा १२ वा ट्वेंटी-२० विजय आहे.

7 / 8

भारताने सर्वाधिक १४ वेळा श्रीलंकेला आणि १३ वेळा ऑस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० पराभूत केले आहे. भारताचा हा एकूण १००वा ट्वेंटी-२० विजय आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातला दुसरा संघ आहे. या विक्रमात पाकिस्तान ११८ विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

8 / 8

निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांची चिवट खेळी व्यर्थ ठरली. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी डेथ ओव्हरमध्ये सुरेख कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या ५ बाद १८६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ३ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभुवनेश्वर कुमाररिषभ पंत
Open in App