भुवीची दोन षटकं शिल्लक असताना आवेशला का गोलंदाजी दिली?
रोहित शर्मा काय म्हणाला, आम्ही पुरेशा धावा उभ्या करू शकलो नाही, फलंदाजांनी निराश केले. खेळपट्टी चांगली होती, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. पण, हे होत राहतं. जेव्हा आपण प्रयोग करतो, तेव्हा ते प्रत्येक वेळी यशस्वी होतीलच असे नाही. या चुकांतून शिकायचे असते आणि त्यात सुधारणा करायची असते.