यशस्वीने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी उपाहारापर्यंत नाबाद शतकी भागीदारी करून त्याने इतिहास रचला. जैस्वालने कसोटी क्रिकेटमधील सलग दुसऱ्या डावात ५० हून अधिक धावा केल्या. डॉमिनिका येथील पहिल्या कसोटीत त्याने १७१ धावांची खेळी केली. अशाप्रकारे, कारकिर्दीतील पहिल्या दोन डावात ५०पेक्षा जास्त धावा करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी १९३४ मध्ये दिलावर हुसेन, १९५५मध्ये कृपाल सिंग, १९७१ मध्ये सुनील गावस्कर, १९९६मध्ये सौरव गांगुली, १९९६मध्ये राहुल द्रविड, २०१०मध्ये सुरेश रैना, २०१३ मध्ये रोहित शर्मा, २०१८मध्ये पृथ्वी शॉ यांनी हा पराक्रम केला होता.