Join us  

विराट कोहली जगात पाचव्या स्थानी आला; रिकी पाँटिंगसह अनेक दिग्गजांवर भारी पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 3:15 AM

Open in App
1 / 4

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने पाचवे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( ३४३५७), कुमार संगकारा ( २८०१६), रिकी पाँटिंग ( २७४८३), माहेला जयवर्धने ( २५९५७) आणि विराट ( २५५३६*) असे टॉप पाच फलंदाज आहेत.

2 / 4

५००व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०+ धावा करणारा विराट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने परदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या विक्रमात रिकी पाँटिंगला मागे टाकले. सचिनने घराबाहेर सर्वाधिक २०१६५ धावा केल्या आहेत, त्यापाठोपाठ कुमार संगकारा ( १५९७३), राहुल द्रविड ( १५२०४), विराट ( १४३७६*) आणि पाँटिंग ( १४३६६) असा क्रम येतो.

3 / 4

रोहित शर्मानंतर WTC मध्ये २००० धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय ठरला. २०२३ मध्ये कसोटीत ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला.

4 / 4

विराट व जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी २०१ चेंडूंत नाबाद १०६ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दिवसअखेर ८४ षटकांत ४ बाद २८८ धावा केल्या. विराट १६१ चेंडूंत ८ चौकारांसह ८७ धावांवर नाबाद आहे, तर जडेजानेही नाबाद ३६ धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली
Open in App