Join us  

Shikhar Dhawan, IND vs WI 3rd ODI Live Updates : शिखर धवन - शुबमन गिल यांची तेंडुलकर- गांगुली यांच्या विक्रमाच्या पंक्तित स्थान, गब्बरची MS Dhoniसोबत बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 8:51 PM

Open in App
1 / 8

India vs West Indies 3rd ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

2 / 8

या दोघांनी शतकी भागीदारी करून सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या भारताच्या महान सलामीवीरांच्या विक्रमाच्या पंक्तित स्थान पटकावले. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, धवनने या सामन्यात अनेक विक्रम मोडले.

3 / 8

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकून कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) याला इतिहास घडवण्याची संधी आहे. भारताच्या एकाही कर्णधाराला विंडीजविरुद्ध निर्भेळ यश मिळवता आलेले नाही.

4 / 8

भारतीय संघाने आजच्या सामन्यात आवेश खानला बाकावर बसवून प्रसिद्ध कृष्णाला पुन्हा संधी दिली आहे. अर्षदीप सिंगला ही मालिका बाकावर बसूनच पाहावी लागली आहे. रवींद्र जडेजा अजूनही १०० टक्के तंदुरुस्त न झाल्यामुळे तो तिसऱ्या वन डे साठी उपलब्ध नाही, बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन आहे, असे बीसीसीआये ट्विट केले.

5 / 8

शिखर धवन व शुबमन गिल यांनी सावध सुरुवात केली. जेसन होल्डरच्या पुनरागमनाने विंडीजच्या गोलंदाजीत प्रभावी बदल जाणवला. दरम्यान, धवनने वन डे क्रिकेटमध्ये ८०० चौकारांचा टप्पा ओलांडला. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली ११५९ चौकारांसह आघाडीवर आहे, त्यानंतर ख्रिस गेल ( ११२८), तमिम इक्बाल ( ८६८) व रोहित शर्मा ( ८५६) यांचा क्रमांक येतो.

6 / 8

धवन व गिल या जोडीने १२व्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. शिखरने त्यानंतर जरा फटकेबाजी करताना आपले ३७वे अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत सर्वाधिक ५०+ धावांची खेळी करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी विराट कोहलीने २०१७ व २०१९मध्ये दोन वेळा ५०+ धावा केल्या होत्या.

7 / 8

भारताने २० षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. भारताकडून परदेशातील वन डे मालिकेत दोन शतकी भागीदारी करणारी धवन व गिल ही तिसरी भारतीय सलामीवीरांची जोडी ठरली. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी २००७मध्ये इंग्लंडविरुद्ध तीन वेळा शतकी सलामी दिली होती, त्यानंतर २०१७मध्ये धवन व अजिंक्य रहाणे यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन द्विशतकी भागीदारी केल्या होत्या. धवन व गिल यांनी या मालिकेत दुसऱ्यांदा शतकी भागीदारी केलीय.

8 / 8

आशिया खंडाबाहेर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा करणाऱ्या विक्रमात धवनने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ( २९) विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात विराट कोहली ( ४९), सचिन तेंडुलकर ( ४८), राहुल द्रविड (४२), सौरव गांगुली ( ३८) व रोहित शर्मा ( ३६) हे आघाडीवर आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनशुभमन गिलमहेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकर
Open in App