Shubman Gill, IND vs WI 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला, पण Sachin Tendulkarच्या विक्रमाशी केली बरोबरी, जाणून घ्या स्टॅट्स!

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही. गिलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला ३ बाद २२५ धावांवर खेळ थांबवावा लागला आणि वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले.

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही. गिलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला ३ बाद २२५ धावांवर खेळ थांबवावा लागला आणि वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले.

शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिले. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पावसामुळे हा सामना ४०-४० षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला.

गिल व श्रेयस अय्यर यांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. श्रेयस ४४ ( ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव ( ८) लगेच माघारी परतला. ९७ धावांवर असताना गिलसाठी विंडीजच्या खेळाडूंनी LBW ची जोरदार अपील केले आणि त्यासाठी DRS ही घेतले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. पण, पावसाने भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा वाढवली.

प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या. ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद राहिला.

वन डे क्रिकेटमध्ये नाबाद राहुनही शतकापासून थोडक्यात मुकणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये गिलचा समावेश झाला आहे. वीरेंद्र सेहवागला २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९९ धावांवर नाबाद रहावे लागले होते. २००१मध्ये युवराज सिंग श्रीलंकेविरुद्ध ९८ धावांवर नाबाद राहिला होता आणि आज गिल ९८ ( वि. वेस्ट इंडिज) धावांवर नाबाद राहिला. २०१४ मध्ये शिखर धवन इंग्लंडविरुद्ध ९७ धावांवर नाबाद राहिला होता.

वन डे क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू ९०+ धावा करूनही नाबाद राहिले पण शतक झळकावू न शकलेल्या फलंदाजांत गिलचा समावेश झाला आहे. २००१मध्ये समीर दिघे ९४ ( वि. वेस्ट इंडिज) व २०२०मध्ये हार्दिक पांड्या ९२ ( वि. ऑस्ट्रेलिया) धावांवर नाबाद राहिले होते. ही त्यांची वन डे तील सर्वोत्तम खेळी आहे.

सलामीवीर म्हणून पहिल्या चार डावांत ३०+ धावा करणारा शुबमन गिल हा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. सचिनने त्याच्या पहिल्या चार डावांत (82, 63, 40, 63) अशी कामगिरी केली होती आणि गिलने (33, 64, 43, 98*) अशी कामगिरी केली.