Join us  

Rohit Sharma Captaincy Record : २०१६नंतर टीम इंडिया झाली 'Number One'; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोडले गेले अनेक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:39 PM

Open in App
1 / 11

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर ( २-१५), वेंकटेश अय्यर ( २-२३) व शार्दूल ठाकूर ( २-३३) यांनीही कमाल गोलंदाजी केली.

2 / 11

वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीत पहिल्या तीन षटकांत दीपक चहरने माघारी पाठवले. पण, चहरला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल ही डोईजड झालेली जोडी हर्षल पटेलनं तोडली. या जोडीनं २५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने अफलातून झेल घेताना पॉवेलला २५ धावांवर ( १४ चेंडू) चालते केले.

3 / 11

किरॉन पोलार्ड या मालिकेतच अपयशी ठरला आणि आजही तो केवळ ५ धावांवर बाद झाला. जेसन होल्डरही ( २) लगेच बाद झाला आणि पोलार्ड व होल्डर यांची विकेट वेंकटेश अय्यरने घेतली. पूरन व रोमारियो शेफर्ड ही जोडी फटकेबाजी करताना दिसली. पूरनने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक पूर्ण करताना विंडीजच्या विजयासाठी संघर्ष सुरूच ठेवला होता.

4 / 11

१८ चेंडूंत विजयासाठी ३७ धावांची गरज असताना शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणण्याचा रोहितचा प्लान यशस्वी ठरला. शार्दूलनच्या संथ गतीने टाकलेल्या चेंडूवर निकोलस फसला अन् इशान किशनने अफलातून झेल टिपला. निकोलस ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावांवर माघारी परतला. शार्दूलने १८व्या षटकात ६ धावा देताना महत्त्वाची विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. हर्षलने १९व्या षटकात शेफर्डला २९ धावांवर बाद करून भारताचा विजय पक्का केला. वेस्ट इंडिजला २० षटकांत ९ बाद १६७ धावा करता आल्या.

5 / 11

तत्पूर्वी, श्रेयस अय्यर ( २५) व इशान किशन ( ३४) यांनी टीम इंडियाची गाडी रुळावर आणल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.

6 / 11

भारताचा हा सलग ९वा ट्वेंटी-२० विजय आहे. अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या नावावर सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका ३-० अशी जिंकली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.

7 / 11

भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी-२० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. त्यानंतर विराट कोहली ( १६) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांचा विक्रम येतो.

8 / 11

घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( १५), न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( १५) व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( १४) हे आघाडीवर आहेत.

9 / 11

रोहितने चार वेळा प्रतिस्पर्धी संघांना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये व्हाईट वॉश दिला आहे. ही भारतीय कर्णधाराची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी त्याने श्रीलंका ( २०१७), वेस्ट इंडिज ( २०१८) व न्यूझीलंड ( २०२१) यांच्याविरुद्ध निर्भेळ यश मिळवले आहेत. पाकिस्तानचा सर्फराज अहमद ( ५) आणि अफगाणिस्तानचा अस्घर अफघान ( ४) यांच्यानंतर आता रोहितचा क्रमांक येतो.

10 / 11

11 / 11

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली
Open in App