वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तरात रोहित शर्माने ( Rohit Sharma) चांगली सुरुवात करून दिली. पण, ५ चेंडूंत ११ धावा करून तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावा चोपल्या. श्रेयस २४ धावांवर, तर सूर्यकुमार ७६ धावांवर बाद झाला. भारताला ३२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या आणि हातात ७ विकेट्स होत्या. रिषभ पंतने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३३ धावा केल्या, दीपक हुडाने नाबाद १० धाव केल्या. भारताने १९ षटकांत ३ बाद १६५ धावा करून सामना जिंकला.