Join us  

Deepak Chahar ६ महिन्यानंतर परतला, ३ विकेट्स घेतल्या अन् दुसऱ्याच सामन्यात बाकावर बसला; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 6:01 PM

Open in App
1 / 5

India vs Zimbabwe 2nd ODI Deepak Chahar : आयपीएल २०२२ अन् त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकलेल्या दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वन डेतून पुनरागमन केले. जवळपास ६ महिन्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या दीपकने तीन विकेट्स घेत मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारही पटकावला. पण, आज सुरू असलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आल्याने तर्कवितर्क चर्चा रंगताना दिसत आहेत.

2 / 5

पहिल्या वन डे सामन्यात दीपक चहर, अक्षर पटेल व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेताना झिम्बाब्वेचा संघ १८९ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात शिखर धवन व शुबमन गिल यांनी १९२ धावा करून संघाला १० विकेट्सने विजय मिळवून दिला. आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १७ षटकांत ४ बाद ११७ धावा केल्या आहेत.

3 / 5

पण, तरीही दीपक चहरला का नाही खेळवले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे आणि पाठीच्या दुखण्यामुळे तो ६ महिने क्रिकेटपासून दूर होता. ३० वर्षीय गोलंदाजाने पहिल्या वन डे सामन्यात ७ षटकांत २७ धावा देताना तीन विकेट्स घेतल्या. पण, आज तो खेळत नसल्याने पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसबाबत शंका उपस्थित होताना दिसतेय.

4 / 5

नाणेफेक झाल्यानंतर लोकेश राहुल म्हणाला, 'खेळपट्टी मागच्या सामन्यातील तुलनेत अधिक टणक दिसतेय... मागील सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली होती आणि आजही तशीच अपेक्षा आहे. दीपक चहर आजच्या सामन्यात खेळणार नाही, त्याच्याजागी शार्दूल ठाकूरचा समावेश केला गेला आहे.' लोकेशने मात्र दीपकच्या न खेळण्यामागचं कारण सांगितलं नाही.

5 / 5

पण, ESPNCricinfo आणि Cricbuzz ने दिलेल्या माहितीनुसार दीपक चहरला niggle म्हणजेत तुरळक दुखापत झाली आहे. BCCI ने अद्याप याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, आगामी आशिया चषक व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन दीपक चहरच्या फिटनेसबाबत धोका पत्करायचा नसल्याने तो आज खेळत नाहीय. त्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली आहे.

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेदीपक चहरबीसीसीआय
Open in App