ind vs zim t20 series Team India player Abhishek Sharma's doctor sister has shared some photos
Cricket Buzz»फोटो गॅलरी »PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 2:41 PMOpen in App1 / 10भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असून, तिथे टीम इंडियाची युवा ब्रिगेड शनिवारपासून पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. 2 / 10त्यामुळे झिम्बाब्बे दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये आयपीएल गाजवणाऱ्या अभिषेक शर्माचा देखील समावेश आहे. 3 / 10अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आयपीएल २०२४ मध्ये ती अनेकदा अभिषेकला चीअर करताना दिसली आहे.4 / 10२६ वर्षीय कोमल शर्मा ही पेशाने डॉक्टर आहे. कोमल ही अभिषेकची लहान बहीण असून ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.5 / 10अभिषेक अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिषेक जेव्हा कोणताही मोठा पराक्रम करतो त्यावेळी तो नेहमी त्याचे यश आणि आनंद आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो.6 / 10अभिषेक शर्माला एक मोठी बहीण देखील आहे. तिचे नाव सानिया शर्मा आहे. परंतु ती प्रसिद्धीपासून दूर आहे. 7 / 10डॉक्टर असलेल्या कोमल शर्माने आता काही फोटो शेअर केले आहेत. डॉक्टरच्या वेशभूषेत दिसत असलेल्या कोमलने कॅप्शनमध्ये म्हटले की, चमत्कार आणि आशेच्या व्यवसायात आहे.8 / 10बहीण कोमलच्या या पोस्टवर व्यक्त होताना अभिषेक शर्माने हसण्याची इमोजी शेअर केली. दरम्यान, ६ जुलै ते १४ जुलै या कालावधीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. 9 / 10हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सर्व सामने खेळवले जातील. भारताची युवा ब्रिगेड यजमान संघाचा पराभव करते का हे पाहण्याजोगे असेल. 10 / 10आयपीएल २०२४ मध्ये अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना २०४.२१ च्या स्ट्राईक रेटने १६ सामन्यांत ४८४ धावा कुटल्या. त्याने एका हंगामात ४२ षटकार मारण्याची किमया साधली. आणखी वाचा Subscribe to Notifications