Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारत- द. आफ्रिका पहिल्या वनडेतील 'हे' खास विक्रमभारत- द. आफ्रिका पहिल्या वनडेतील 'हे' खास विक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 6:28 PMOpen in App1 / 6दोन्ही कर्णधाराचे शतक - डरबनमध्ये झालेल्या सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डू प्लेसिसने १२० धावा ठोकल्या, तर धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ११२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.2 / 6दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतकी खेळी करण्याची ही चौथी वेळ - क्रिकेट इतिहासामध्ये एकाच सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतकी खेळी करण्याची ही चौथी वेळ आहे. चारपैकी तीन सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीचा समावेश आहे आणि प्रत्येक वेळेस भारताचा विजय झाला आहे.3 / 6विराट-अजिंक्यची भागिदारी : दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या २७० धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागिदारी केली. दक्षिण आफिकेमध्ये यजमान संघाविरुद्ध भारताकडून ही दुसरी सर्वात मोठी भागिदारी आहे. याआधी २००१मध्ये सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या सलामी जोडीने १९३ धावांची भागिदारी केली होती.4 / 6तिसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागिदारी : विराट आणि रहाणेमध्ये तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या १८९ धावांची भागिदारी दक्षिण आफिकेविरोधात टीम इंडियाची सर्वात मोठी भागिदारी ठरली. याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी २००७ मध्ये १५८ धावांची भागिदारी झाली होती, तर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्यात २०१५ मध्ये तिसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागिदारी झाली होती.5 / 6विराटचा शतकांचा विक्रम : डरबनमध्ये विराट कोहलीने कर्णधारपदावर असताना ११ वे शतक ठोकले. कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली. गांगुलीने कर्णधारपदी असताना ११ शतकं ठोकली होती. या यादीमध्ये हे दोघेही संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉण्टिंग (२२ शतकं) आणि दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफिकेचा माजी कर्णधार ए.बी. डिव्हिलिअर्स (१३ शतकं) आहे.6 / 6सचिनच्या शतकांच्या आणखी जवळ : विराटने डरबनमध्ये ११२ धावांची खेळी करत एकदिवसीय कारकिर्दीतील ३३ वे शतक झळकावले. माजी विक्रमवीर खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या कोहली आणखी जवळ पोहोचला आहे. विराटने २०३ सामन्यात ३३ शतकं ठोकली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications