Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वाभारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:58 PMOpen in App1 / 8कटक: भारताने पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा ९३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.2 / 8या सामन्यात भारताने दिलेल्या 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 87 धावांत गारद झाला.3 / 8भारतीय संघाचा हा टी-20 च्या इतिहासातीस सर्वात मोठा विजय आहे. 4 / 8भारताकडून यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादवनं मिळून आठ षटकांमध्ये 41 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 5 / 8हार्दिक पंड्याने 3 तर कुलदीप यादवने 2 बळी टिपत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.6 / 8तसेच, यजुवेंद्र चहल चार विकेट घेत अफगाणिस्तानच्या रशीद याचा विक्रम मोडला. चहलने वर्षभरात 19 बळी घेतले आहेत. रशीदच्या नावावर वर्षभरात 17 बळी आहेत.7 / 8श्रीलंकेकडून दुष्मंथा चमीरा 12 (14), कुशल परेरा 19 (28), निरोशन डिकवेला, 13 (8) आणि उपुल थरंगा 23 (16) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. 8 / 8श्रीलंकेने या सामन्यात 20 षटकांत 3 बाद 180 धावा करून लंकेपुढे विजयासाठी 181 धावांचे आव्हान ठेवले. आणखी वाचा Subscribe to Notifications