Join us  

गौतम गंभीरला मिळणार पर डे 21 हजार रुपये, किती असेल संपूर्ण सॅलरी? द्रविडला किती मिळायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 4:45 PM

Open in App
1 / 7

गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक झाला आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ सपल्यानंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. द्रविडचा कार्यकाळ केवळ टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंतच होता. यामुळे भारताने टी-२० विश्वचषक जिंकंलयानंतर प्रशिक्षक द्रविडचा कार्यकाळही संपला.

2 / 7

टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ 27 जुलैपासून सुरू होईल. या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात T20 सामना होणार आहे. महत्वाचे म्हणजे, श्रीलंका दौऱ्यासाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही.

3 / 7

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून त्याच्या पगाराचा जबरदस्त चर्चा होत आहे. मात्र अद्याप, बीसीसीआयने यासंदर्भात कसल्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही. गंभीरचा कार्यकाळ विश्वचषक २०२७ पर्यंत असेल.

4 / 7

गौतम गंभीरला राहुल द्रविडच्या तुलनेत अधिक सॅलरी मिळू शकते, असे मानले जाते. भारतीय संघाला विश्वचषक विजेता बनविण्यात मोलाचा वाटा असलेल्या राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून वर्षाला 12 कोटी रुपये मिळत होते.

5 / 7

फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तपत्रानुसार, गौतम गंभीरला परदेश दौऱ्यावर असताना दैनंदिन भत्त्याच्या स्वरुपात 21 हजार रुपये मिळतील. ही रक्कम सॅलरी शिवाय असेल. या दैनिक भत्त्यात अन्न, प्रवास, लॉन्ड्री आदींचा समावेश असेल.

6 / 7

प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची खरी परीक्षा 2025 मध्ये होणार आहे. यावर्षी आयसीसीच्या दोन स्पर्धा होणार आहेत. यात पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफीचाही समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही याच वर्षी खेळवला जाणार आहे.

7 / 7

टॅग्स :गौतम गंभीरबीसीसीआयराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ