Cricket Buzz»फोटो गॅलरी »World Test Championship 2023: टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हानWorld Test Championship 2023: टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हान By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 6:19 PMOpen in App1 / 7World Test Championship 2023 Final - राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारताने परदेशात गमावलेली ही दुसरी मालिका आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला सपाटून मार खावा लागला होता. त्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ असे आघाडीवर असूनही टीम इंडियाला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. 2 / 7विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर २-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु या मालिकेतील पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( World Test Championship 2023) फायनलमध्ये जाण्याचा मार्गही खडतर झाला आहे. 3 / 7भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले. 4 / 7जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 5 / 7या पराभवानंतर भारतीय संघ ७७ गुणांसह WTC 23 Point Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडने ६४ गुणांसह सातव्या स्थानावर कूच केली आहे. ऑस्ट्रेलिया ८४ गुण व ७७.७८ टक्क्यांसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका ६० गुण व ७१.४३ टक्क्यांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. 6 / 7दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिका गमावणेही भारताला महागात पडले आहे. आफ्रिकेविरुद्ध भारताला २४० व २१२ धावांचा यशस्वी बचाव करता आला नाही. इंग्लंडविरुद्ध तर चौथ्या डावात भारताने ३७८ धावा दिल्या. 7 / 7- २ कसोटी वि. बांगलादेश ( दौरा) आणि ४ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( घरच्या मैदानावर); आता भारताला बांगलादेश दौऱ्यावरील दोन्ही कसोटी व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी जिंकाव्या लागतील, तर आणि तरच ते जागतिक कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications