भारतासाठी 2011, तर पाकसाठी 1992 नंतर संधी; T-20 वर्ल्ड कपमध्ये योगायोग, कोणाचे पारडे जड असेल?

भारत आणि पाकिस्तानचे संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पाहूया सध्या कोणते योगायोग जुळून येत आहेत.

भारत आणि पाकिस्तानचे संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत भारताचा संघ इंग्लंडशी तर पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानच्या इथपर्यंतच्या प्रवासात नशीबाची जोड आहे. त्याच वेळी, पाकिस्तानी समर्थक संघाच्या खराब कामगिरीमध्ये 1992 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचा योगायोग देखील शोधत आहेत.

दुसरीकडे, भारतीय संघाची कामगिरी कमी-अधिक प्रमाणात भक्कम राहिली आहे आणि टीम इंडियाच्या समर्थकांनाही योगायोगात कमी रस नाही. भारतीय संघाच्या समर्थकांनी संघाचा प्रवास 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाशी जोडण्यास सुरुवात केली आहे. अखेर 1992 आणि 2011 चा योगायोग काय होता, चला पाहूया.

भारतीय क्रिकेट संघाबाबात पहिले जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या या T20 विश्वचषकात भारताच्या मिशनची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या दमदार विजयाने झाली. यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता येथे सर्व सामने जिंकले आहेत.

2011 बद्दल बोलायचं झालं तर त्या वर्षी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या T20 विश्वचषकातही असेच काहीसे घडले. त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर भारताने आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून जेतेपद पटकावलं. आता भारतीय चाहते या योगायोगाबद्दल बोलत आहेत.

याशिवाय इतरही काही रंजक योगायोग आहेत. 2011 मध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता, तर 2022 मध्येही पाकिस्तान-नेदरलँड्सचा पराभव केला होता. याशिवाय 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला होता आणि 2022 मध्ये देखील आयर्लंडने इंग्लंडला पराभूत केले होते.

पाकिस्तानच्या योगायोगाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर 1992 मध्ये एकदिवसीय विश्वचषक सामने ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आले होते. 1992 मध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभूत व्हावे लागले होते. यावेळीही ग्रुप सामन्यांमध्ये पाकिस्तानला भारताकडून पराभूत व्हावे लागलेय. तर दुसरीकडे 1992 मध्ये पाकिस्तानचा संघ सर्वात कमी पॉईंट्ससह उपांत्य फेरीत पोहोचला होता.

या T20 विश्वचषकातही असेच काहीसे घडले. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चारही संघांपैकी पाकिस्तानचे सर्वात कमी 6 गुण आहेत. काही चाहत्यांनी असेही म्हटले आहे की 1992 च्या कर्णधार इम्रान खानच्या नावातील सर्व अक्षरांची बेरीज केली की ती 9 होते, तर बाबर आझमच्या नावातील सर्व अक्षरांची बेरीजही 9 होते. याशिवाय यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ त्यावर्षीही उपांत्य फेरी गाठू शकला नव्हता.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 1992 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले होते आणि यावेळी ते न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानने त्यावेळच्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला पराभूत केलं होतं, पण या योगायोगावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात अजूनही सामना बाकी आहे.