India vs Pakistan, Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान एकदा नव्हे तर ३ वेळा भिडणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी बम्पर लॉटरी, जाणून घ्या कशी

India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेट महासंघाने मंगळवारी आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई येथे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे.

India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेट महासंघाने मंगळवारी आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई येथे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच आशिया चषक स्पर्धेसाठी निवडला जाणारा संघच पुढे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळेले, हे जवळपास ठरले आहे.

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आमि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यासाठीही वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ही चांगली संधी आहे. २७ ऑगस्टला श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या लढतीने स्पर्धेला सुरुवात होणार असली तरी खरी उत्सुकता २८ तारखेला होणाऱ्या भारत- पाकिस्तान यांच्या लढतीची आहे. मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने पराभूत केल्यानंतर प्रथमच उभय संघ एकमेकांसमोर येणार आहेत.

जाहीर झालेल्या वेळापत्रकात भारत-पाकिस्तान यांच्यात एकच लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात आशिया चषक २०२२मध्ये India vs Pakistan यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात ४ सप्टेंबरला दुसरा सामना होऊ शकतो. Super 4 च्या वेळापत्रकानुसार अ गटातील अव्वल दोन संघ ४ सप्टेंबरला एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. भारत-पाकिस्तान अ गटात आहेत आणि ते अव्वल दोनमध्ये राहतील यात शंका नाही.

अशात तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. ११ सप्टेंबरला India vs Pakistan अशी फायनल मॅच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही संघांचा फॉर्म व स्टार खेळाडूंचा भरणा पाहता, आशिया चषक २०२२ ची फायनल उभय संघांमध्येच होईल अशी ९९ टक्के खात्री आहे. श्रीलंका, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान यांनी काही उलटफेर केला नाही, तर चाहत्यांना भारत-पाकिस्तान अशी मेगा फायनल पाहायला मिळू शकते.