Join us  

IND vs SA 1T20I : हार्दिक पांड्याच्या जागी कोण खेळणार? अर्शदीप-जसप्रीत प्रथमच सोबत दिसणार, पाहा Playing XI कशी असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 5:33 PM

Open in App
1 / 5

India vs South Africa Playing XI : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा अँड टीम आजपासून दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-२०त सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली गेली आहे. त्यात टेंशन वाढवणारी बातमी म्हणजे मोहम्मद शमी अजूनही कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि दीपक हुडाने दुखापतीमुळे माघार घेतलीय. या परिस्थितीत कर्णधार रोहितसमोर तगडी प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवण्याचे आव्हान आहे.

2 / 5

भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवरणार हे निश्चित आहे. हार्दिकला विश्रींती आणि दीपक हुडाची दुखापती यामुळे अक्षर पटेल व आर अश्विन हे अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय रोहित समोर आहेत, परंतु ते हार्दिक प दीपक एवढा प्रभाव पाडू शकतील यात शंका आहेच. अशात रोहित शर्मा पाच गोलंदाज किंवा एक अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू यापैकी एक पर्याय निवडू शकतो.

3 / 5

भारताने ६+५ असा फॉर्म्युला ठरवल्यास रिषभ पंत हा हार्दिक पांड्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो. आशिया चषक स्पर्धेत रिषभला हाँगकाँगविरुद्धच्या लढतीत हार्दिकच्याच जागी संधी मिळाली होती. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणजे भारताला पाच गोलंदाजांसह ( अक्षर पटेल हा अष्टपैलू खेळाडू ) मैदानावर उतरावे लागेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रिषभला पुरेशी संधी मिळावी असा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संधी मिळाली नाही.

4 / 5

रिषभ पंतसह अर्शदीप सिंग याचेही प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होणार आहे. भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिल्यामुळे अर्शदीपला संधी मिळणार आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाज चाचपडताना दिसत आहेत अशात अर्शदीप हा सक्षम पर्याय ठरू शकतो. अर्शदीप व जसप्रीत बुमराह हे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट प्रथमच सोबत खेळणार आहेत.

5 / 5

भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहार्दिक पांड्यारिषभ पंतजसप्रित बुमराह
Open in App