भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमधील तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना शनिवारी केप टाऊन येथे रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सराव सत्रादरम्यान चर्चा करताना.
दुसऱ्या सामन्याप्रमाणेच या लढतीतही धमाकेदार फलंदाजी करण्याचा धोनीचा इरादा असेल.
भारताच्या फलंदाजांना रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
पुनरागमनानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या रैनाला या लढतीत मोठी खेळी करून दाखवावी लागणार आहे.