Join us  

India Tour of West Indies : ७०४७ किलोमीटर प्रवासासाठी BCCI ने मोजले ३.५ कोटी; कोरोना नव्हे, तर त्यामागे आहे भलतंच कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:41 AM

Open in App
1 / 7

India Tour of West Indies : भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामने व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका येथे होणार आहे आणि वन डे संघाचे नेतृत्व धवनकडे सोपवले गेले आहेत.

2 / 7

काही सीनियर खेळाडू ट्वेंटी-२० मालिकेसाठी नंतर विंडीजला दाखल होतील. पण, सध्या भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा एक वेगळाच विषय चर्चेत आलाय आणि तो म्हणजे ३.५ कोटींचा...

3 / 7

इंग्लंड दौऱ्यावरील ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू मँचेस्टर येथून वेस्ट इंडिजला (Manchester to West Indies) रवाना झाले. त्यांच्यासाठी एका खास चार्टर्ड फ्लाईटची सोय करण्यात आली होती आणि त्यासाठीच BCCI ने ३.५ कोटी रूपये खर्च केले.

4 / 7

मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या ७०४७ किलोमीटरच्या हवाई प्रवासासाठी बीसीसीआयने मोजलेली एवढी रक्कम ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामागे कोरोना व्हायरसची भीती असं कारण असण्याची शक्यता वर्तविली जात होती, पण समोर आलं ते वेगळंच चित्र...

5 / 7

इंग्लंडमधील एका सूत्राने TOIला ही माहिती दिली. बीसीसीआयने चार्टर्ड फ्लाईटसाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले. ज्याच्यात बसून मंगळवारी भारतीय संघाने मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन असा प्रवास केला.

6 / 7

चार्टर्ड फ्लाईट बूक करण्यामागे कोरोनाचं कारण ग्राह्य धरलं जात होतं, परंतु कारण दुसरंच निघालं. भारताच्या १६ सदस्यांससह साहाय्यक स्टाफ, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व काही खेळाडूंच्या पत्नी यांना विंडीज दौऱ्यावर जायचे होते. त्यामुळे एवढ्या सर्व सदस्यांसाठी तिकीट मिळत नसल्याने BCCI ने चार्टर्ड प्लेन बूक केला.

7 / 7

मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या प्रवासासाठी बिझनेस क्लासचे तिकीट जवळपास २ लाख रुपये आहे. त्यानुसार खेळाडूंना घेऊन जाण्याचा खर्च आता झालेल्या खर्चाच्या तुलनेत फार कमीच झाला असता. पण, तिकीट न मिळाल्याने BCCI ने हा निर्णय घेतला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनबीसीसीआय
Open in App