Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार यादवचा जलवा! पदार्पणातच एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर

India vs Australia 1st test live score updates : मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व केएस भरत ( KS Bharat) यांनी पदार्पण केले आहे.

मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून २ बाद २ धावा अशी त्यांची अवस्था केली. दरम्यान, सूर्यकुमार यादवने पदार्पणातच विक्रम नावावर केला. आतापर्यंत एकाही भारतीयाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला नव्हता.

२०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला.

नागपूरच्या VCA स्टेडियमवर कसोटी पदार्पण करणाऱ्या यादीत सूर्यकुमार व भरत यांचे नाव समाविष्ट झाले आहे. यापूर्वी मुरली विजय ( वि. ऑस्ट्रेलिया, २००८), एस बद्रीनाथ ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०), वृद्धीमान सहा ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) आणि रवींद्र जडेजा ( वि. इंग्लंड, २०१२) यांनी येथे पदार्पण केले होते.

एमएसके प्रसाद यांच्यानंतर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करणारा केएस भारत हा आंध्रप्रदेशचा दुसरा खेळआडू ठरला.

२००० सालानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादवने तिसरे स्थान पटकावले. सूर्याने ३२ वर्ष व १४८ दिवसांचा असताना आज पदार्पण केले. यापूर्वी साबा करिम ३२ वर्ष व ३६२ दिवस ( वि. बांगलादेश, २०००) आणि समीर दिघे ३२ वर्ष व १६१ दिवस ( वि. ऑस्ट्रेलिया, २००१) असा प राक्रम केला होता.

भारताकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये वयाच्या तीशीनंतर पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला खेळाडू ठरला. त्याने १४ मार्च २०२१ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३० वर्ष व १८१ दिवसांचा असताना, १८ जुलै २०२१ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये ३० वर्ष व ३०७ दिवसांचा असताना पदार्पण केले होते. आज तो ३२ वर्ष व १४८ दिवसांचा आहे आणि कसोटीत पदार्पण केले आहे.