Join us  

Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार यादवचा जलवा! पदार्पणातच एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 10:30 AM

Open in App
1 / 7

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व केएस भरत ( KS Bharat) यांनी पदार्पण केले आहे.

2 / 7

मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून २ बाद २ धावा अशी त्यांची अवस्था केली. दरम्यान, सूर्यकुमार यादवने पदार्पणातच विक्रम नावावर केला. आतापर्यंत एकाही भारतीयाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला नव्हता.

3 / 7

२०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला.

4 / 7

नागपूरच्या VCA स्टेडियमवर कसोटी पदार्पण करणाऱ्या यादीत सूर्यकुमार व भरत यांचे नाव समाविष्ट झाले आहे. यापूर्वी मुरली विजय ( वि. ऑस्ट्रेलिया, २००८), एस बद्रीनाथ ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०), वृद्धीमान सहा ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) आणि रवींद्र जडेजा ( वि. इंग्लंड, २०१२) यांनी येथे पदार्पण केले होते.

5 / 7

एमएसके प्रसाद यांच्यानंतर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करणारा केएस भारत हा आंध्रप्रदेशचा दुसरा खेळआडू ठरला.

6 / 7

२००० सालानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादवने तिसरे स्थान पटकावले. सूर्याने ३२ वर्ष व १४८ दिवसांचा असताना आज पदार्पण केले. यापूर्वी साबा करिम ३२ वर्ष व ३६२ दिवस ( वि. बांगलादेश, २०००) आणि समीर दिघे ३२ वर्ष व १६१ दिवस ( वि. ऑस्ट्रेलिया, २००१) असा प राक्रम केला होता.

7 / 7

भारताकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये वयाच्या तीशीनंतर पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला खेळाडू ठरला. त्याने १४ मार्च २०२१ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३० वर्ष व १८१ दिवसांचा असताना, १८ जुलै २०२१ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये ३० वर्ष व ३०७ दिवसांचा असताना पदार्पण केले होते. आज तो ३२ वर्ष व १४८ दिवसांचा आहे आणि कसोटीत पदार्पण केले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादव
Open in App