Join us  

Ice-Cream ची मजा घेत होती 'तरुणी'! कॅमेरामनची नजर पडली बिचारी लाजली अन्... Photo Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 3:32 PM

Open in App
1 / 9

शुभमन गिलच्या शतकाने भारताला चौथ्या कसोटीत चांगल्या स्थितीत आणले आहे. शनिवार असल्याने मोठ्या संख्येने चाहतेही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित आहेत. प्रचंड गरमी असूनही प्रेक्षकांचा उत्साह वरच्या पट्टीचा आहे. त्यात कॅमेरामनही सुंदर चेहरे टिपण्याचे काम करत आहेत आणि गरमीत Ice-Cream ची मजा घेत असलेल्या तरुणीकडे कॅमेरामनची नजर पडली अन्..

2 / 9

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा ( ३५) व शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीजारी केली.

3 / 9

शुबमनने कसोटीतील दुसरे शतक पूर्ण करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. कॅलेंडर वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. त्याने २०२३ मध्ये वन डेत द्विशतक, ट्वेंटी-२०त शतक आणि आज कसोटीत शतक झळकावले. यापूर्वी कॅलेंडर वर्षात रोहित शर्मा, सुरेश रैना व लोकेश राहुल यांनी हा पराक्रम केला होता.

4 / 9

स्टीव्ह स्मिथच्या चतुर क्षेत्ररक्षणात त्यांना धाव शोधताना संघर्ष करायला लावले. १२-१३ षटकं भारताच्या या जोडीला एकही चौकार खेचता आला नाही आणि दीडच्या सरासरीनेच धावा करता आल्या. स्मिथची फिल्ड प्लेसमेंट भारताच्या धावांवर अंकुश ठेवून होती.

5 / 9

अखेर ९६ चेंडूंनंतर शुबमनने भारताला चौकार मिळवून दिली. त्याने कॅमेरून ग्रीनला दोन खणखणीत चौकार खेचले. त्यानंतर शुबमनने त्याचे शतकही पूर्ण केले. त्याने १९४ चेंडूंत कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले, अहमदाबाद येथे शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा सलामीवीर ठरला.

6 / 9

शुबमन १२७ व विराट कोहली २६ धावांवर खेळत आहेत आणि त्यांनी अर्धशतक भागीदारी पूर्ण करताना भारताची धावसंख्या २ बाद २३८ अशी वाढवली आहे.

7 / 9

दरम्यान कॅमेरानने त्याचा कॅमेरा एका तरुणीकडे वळवला. तरुणी मजेत आईस क्रिम खात होती अन् कॅमेरामन तिच्यावर कॅमेरा काही हलवत नव्हता.

8 / 9

सुरुवातीला तिला काय करावे हेच सुचेनासे झाले आणि अवघडत तिने हात उंचावून हाय केले. तरीही कॅमेरा काही तिच्यावरून हटला नाही

9 / 9

अशा स्थितीत बिचारी ती लाजली अन् मागे वळून पाहू लागलीय.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑफ द फिल्ड
Open in App