Join us  

Ind vs Aus 4th test live : उस्मान ख्वाजाचा 'पाकिस्तानीं'ना अभिमान; कारण २४ वर्षानंतर झालाय असा चमत्कार, फलंदाज भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 5:27 PM

Open in App
1 / 6

ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा ( Usman Khwaja) भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. त्याच्या शतकी खेळीला कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अनुभवाची जोड आणि कॅमेरून ग्रीनची आक्रमक फटकेबाजीची साथ मिळाली.

2 / 6

उस्मान ख्वाजाने पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात शतक पूर्ण केले. आशिया खंडातील ( पाकिस्ता, श्रीलंका आणि भारत) मागील १७ कसोटी इनिंग्जमध्ये उस्मान ख्वाजाने ( 85, 141, 97, 160, 44*, 91, 104*, 71, 37, 29, 1, 5, 81, 6, 60, 0, 104*) खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. १७ इनिंग्जमध्ये त्याने ७९.७१च्या सरासरीने १११६ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

3 / 6

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३) हे माघारी परतल्यानंतर ख्वाजाने एकहाती खिंड लढवली. ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. स्मिथ १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला.

4 / 6

मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. कॅमेरून ग्रीन व ख्वाजा यांनी झटपट धावा जोडताना ११६ चेंडूंत नाबाद ८५ धावांची भागीदारी केली. ख्वाजाने भारताविरुद्ध पहिले शतक झळकावले आणि त्याचे हे एकंदर १४ वे कसोटी शतक ठरले. ख्वाजा १०४ धावांवर, तर हँड्सकोम्ब ४९ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद २५५ धावा झाल्या आहेत.

5 / 6

भारतात कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा १९९९नंतरचा उस्मान ख्वाजा तिसरा पाकिस्तानातील जन्मलेला खेळाडू ठरला. यापूर्वी १९९९ साली सईद अन्वर व शाहिद आफ्रिदी यांनी अनुक्रमे कोलकाता व चेन्नई कसोटीत असा पराक्रम केला होता. उस्मान ख्वाजाच्या या शतकाचा पाकिस्तानीही जल्लोष करताना दिसत आहेत.

6 / 6

या शतकानंतर उस्मान ख्वाजा भावुक झाला. तो म्हणाला,''हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. मी यापूर्वी दोन वेळा भारत दौऱ्यावर आलो आणि दोन्ही वेळेस मला सर्वच्या सर्व ८ कसोटींत पाणी देण्याचं काम दिलं गेलं. हा खूप मोठा प्रवास होता आणि अखेरीस मी भारतात शतक झळकावले. एक ऑस्ट्रेलियन म्हणून मला या खेळीचा अभिमान आहे.''

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापाकिस्तानशाहिद अफ्रिदी
Open in App