Join us  

India vs Australia, 1st Test : टीम इंडियाची नाचक्की; १९२४नंतर कसोटी क्रिकेटमध्ये घडला असा लाजीरवाणा प्रसंग!

By स्वदेश घाणेकर | Published: December 19, 2020 12:34 PM

Open in App
1 / 9

India vs Australia, 1st Test, 3rd Day : शरणागती कशी पत्करावी, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसारखी... पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. पण, जोश हेझलवूड व पॅट कमिन्स या जोडीनं जो दणका दिला.

2 / 9

त्यातून टीम इंडियाला सावरताच आले नाही. टीम इंडिया पहिली कसोटी जिंकेल, असा दावा करणारे तोंडावर पडले. हेझलवूडनं ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या.

3 / 9

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ४२ धावा झाल्या, तर ८ फलंदाज माघारी परतले. भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताला ९ बाद ३६ धावांवर खेळ थांबवावा लागला.

4 / 9

दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पहिल्या डावात टीम इंडिला सावरणारा चेतेश्वर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूंन त्याला बाद केले.

5 / 9

पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं मयांक ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( ०) यांना बाद करून टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. कसोटी क्रिकेटमध्ये कमी धावांत पाच विकेट्स गमावण्याची ही दुसरी निचांक कामगिरी आहे. यापूर्वी १९५२मध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे पाच फलंदाज ६ धावांवर माघारी परतले होते.

6 / 9

पॅट कमिन्सनं पुढच्या षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीननं अविश्वसनीय झेल घेताना विराटला चलते केले. टीम इंडियाची अवस्था ६ बाद १९ अशी झाली.

7 / 9

१९व्या षटकात जोश हेझलवूडनं पुन्हा सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले. वृद्धीमान सहा व आर अश्विन हे बाद झाल्यानंतर टीम इंडियाची हालत ८ बाद २६ अशी झाली. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताचा डाव ९ बाद ३६ धावांवर संपुष्टात आला.

8 / 9

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा संघातील एकाही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही. मयांक अग्रवाल ( ९) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

9 / 9

भारतीय क्रिकेटवर अशी नामुष्की प्रथम ओढावली. यापूर्वी १९२४मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ एडबस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध ३० धावांवर माघारी परतला होता. हर्बी टेलर (७) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापृथ्वी शॉजसप्रित बुमराहमयांक अग्रवालविराट कोहलीचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेमोहम्मद शामीआर अश्विनवृद्धिमान साहा