India vs Australia, 1st Test : विराट कोहलीनं मोडला मन्सूर अली खान यांचा मोठा विक्रम; पहिल्याच दिवशी केले अऩेक पराक्रम

पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.

१९१ चेंडूंतील ६८ धावांची भागीदारी ५०व्या षटकात संपुष्टात आली. नॅथनच्या गोलंदाजीवर गलीवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेननं झेल टिपून पुजाराला माघारी जाण्यास भाग पाडले. मैदानावरील पंचांनी नाबाद देताच ऑसी संघानं DRSघेतला आणि त्यात चेंडू बॅटवर आदळल्याचे स्पष्ट दिसत होते. पुजारा १६० चेंडूंत २ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतला.

पण, विराटनं संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे २३वे अर्धशतक ठरले आणि त्यानं या कामगिरीसह अनेक विक्रमही मोडले.

विराट कोहलीनं ३९ वी धाव घेताच महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा आता विराटच्या नावावर जमा झाल्या आहेत. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार - विराट कोहली - ८१६*, महेंद्रसिंग धोनी - ८१३, सौरव गांगुली - ४४९ , मोहम्मद अझरुद्दीन - ३११, सचिन तेंडुलकर - २८८.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधाराचा विक्रमही त्यानं नावावर केला. भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांचा ५१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ८३०* हून अधिक धावा केल्या आहेत. त्यानं पतौडी यांचा ८२९ धावांचा विक्रम मोडला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( ८१३), सुनील गावस्कर ( ५४३) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( ५०३) यांचा क्रमांक येतो.

इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधाराचा विक्रम विराटच्या नावावर आहे.

कसोटीत ५०वेळा ५०+ धावा करणारा विराट कोहली हा ८वा भारतीय फलंदाज आहे. सर्वात कमी डावांतमध्ये हा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. सचिन तेंडुलकरनं १२७ डावांमध्ये हा विक्रम केला, त्यानंतर राहुल द्रविड ( १३६ डाव) याचा नंबर येतो. विराटला १४६ डाव खेळावे लागले.

Read in English