Join us  

India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI!

By स्वदेश घाणेकर | Published: January 05, 2021 10:29 AM

Open in App
1 / 10

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या खेळाडूंचे दुखापतींचे सत्र कायम असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

2 / 10

इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यानंतर टीम इंडियाला बसलेला हा तिसरा मोठा धक्का होता. त्यात आणखी एकाची भर पडली. टीम इंडियाचा फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) यानं माघार घेतली आहे. BCCIनं ही माहिती दिली.

3 / 10

सराव करताना राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाज बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्यानं या मालिकेतून माघार घेतली आहे आणि दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, असे बीसीसीआयनं सांगितले आहे. आता तो मायदेशात परतणार असून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी दाखल होईल.

4 / 10

भुवनेश्वर कुमार , इशांत शर्मा, मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. विराट कोहली पत्नीच्या बाळंतपणासाठी रजेवर आहे. त्यामुळे लोकेश राहुलच्या माघारीनं टीम इंडियाला धक्का दिला आहे. तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल व हनुमा विहारी यांच्या जागी रोहित शर्मा व लोकेश राहुलचे स्थान पक्के होणार आहे. पण, आता मयांक संघात कायम राहणार आहे.

5 / 10

मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्या जागी टी नटराजन ( T Natarajan) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांना स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माकडे उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

6 / 10

सलामीला - रोहित शर्मा व मयांक अग्रवाल.. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उशीरानं दाखल झाला. त्यानंतर १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून त्यानं सरावाला सुरुवात केली. तो तिसऱ्या कसोटीत मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

7 / 10

मधली फळी - चेतेश्वर पुजारा फॉर्माशी झगडत असला तरी त्याचे संघातील स्थान कायम आहे. त्याच्या जोडीला अजिंक्य रहाणे आहेच. हनुमा विहारीला बाहेरचा रस्ता दाखवून शुबमन गिल संघातील स्थान कायम राखेल. गिलला सलामीएवजी चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळेल.

8 / 10

रिषभ पंत, रवींद्र जडेजा व आर अश्विन यांच्यावर तळाला डाव सावरण्याची जबाबदार असेल.

9 / 10

जलदगती गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह ही जोडी कायम राहिल, परंतु उमेश यादवच्या जागी टी नटराजन, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांची नाव चर्चेत आहेत. शार्दूलला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

10 / 10

असा असेल Playing XI -रोहित शर्मा ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे ( कर्णधार), रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलरोहित शर्मामयांक अग्रवालचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेशुभमन गिलरिषभ पंतरवींद्र जडेजाआर अश्विनजसप्रित बुमराह