Join us  

'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का!

By स्वदेश घाणेकर | Published: January 12, 2021 1:47 PM

Open in App
1 / 17

सिडनी कसोटीतील ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या आनंदावर विरझण टाकणारी बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आणि तिसऱ्या कसोटीतील नायक हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांच्यापाठोपाठ प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानेही चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे.

2 / 17

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. त्यात पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली ( Virat Kohli) पत्नीच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. कसोटी मालिका सुरू झाल्यापासून मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी ही अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे.

3 / 17

त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचे नेमके किती शिलेदार फिट आहेत, याबाबातची उत्सुकता वाढली आहे. मयांक अग्रवालला सराव करताना दुखापत झाली आहे आणि त्याच्या वैद्यकिय अहवाल येणे शिल्लक आहे. चौथ्या कसोटीसाठी अंतिम ११ निवडताना कर्णधार अजिंक्य रहाणेसमोर मर्यादित पर्याय आहेत.

4 / 17

टी नटराजन ( T Natarajan) - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ट्वेंटी-20 व वन डे संघाकडून पदार्पण करणाऱ्या टी नटराजनला चौथ्या कसोटीत संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

5 / 17

नवदीप सैनी ( Navdeep Saini ) - उमेश यादवच्या जागी संघात स्थान पटकावणाऱ्या सैनीनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहनं माघार घेतल्यामुळे त्याच्यावरील जबाबदारी वाढणार आहे.

6 / 17

अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) - समोर संकट असतानाही शातं राहून त्याचा धैर्यानं कसा सामना करायचा, याची शिकवण या मालिकेत अजिंक्यनं सर्वांना दिली. मेलबर्न कसोटीतील अजिंक्यचे शतक हे इतिहासाच्या पुस्तकात सुवर्णाक्षरानं लिहिलं गेलं. त्यानं आतापर्यंत

7 / 17

मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal ) - सराव करताना मयांक अग्रवालला दुखापत झालीय आणि त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच त्याचे अंतिम ११मधील स्थान पक्के होईल. मयांकला पहिल्या दोन सामन्यांत ३१ धावा करता आल्या आहेत.

8 / 17

कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) - रवींद्र जडेजाच्या माघारीमुळे अतिरिक्त फिरकीपटू म्हणून अजिंक्य रहाणे कुलदीप यादवचा विचार करू शकतो.

9 / 17

शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) - बुमराहच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूरचे अंतिम ११मधील स्थान पक्के समजले जात आहे.

10 / 17

मोह्हमद सिराज ( Mohammad Siraj ) - बुमराहच्या अनुपस्थितीत दोन सामन्यांचा अनुभव असलेला सिराज टीम इंडियाच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व सांभाळेल. दोन सामन्यांत त्यानं ७ विकेट्स घेतल्या आहेत.

11 / 17

आर अश्विन ( Ravi Ashwin) - सिडनी कसोटीतील ऐतिहासिक कामगिरीचा खरा शिल्पकार... हनुमा विहारीसह अश्विननं जी चिवट खेळी केली त्याच्या जोरावर टीम इंडियानं पराभव टाळला. तीन कसोटींमध्ये त्यानं १२ विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत अश्विन पाठीच्या दुखण्याशी संघर्ष करत होता. पण, तो तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

12 / 17

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) - अपयशी ठरूनही संधी मिळाल्याचा फायदा उचलण्यात पृथ्वी शॉ अपयशी ठरला. त्याच्या फुटवर्कवरून बरीच चर्चा झाली. त्यावर त्यानं काम केल्याची चर्चा आहे. मयांक अग्रवाल तंदुरुस्त नसल्याचे जाहीर झाल्यास पृथ्वीला आणखी एक संधी मिळू शकते. पहिल्या कसोटीत त्यानं ० व ४ धावा केल्या.

13 / 17

वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha) - यष्टिमागे व फलंदाजीत सहानं पहिल्या कसोटीत निराश केले. पण, टीम इंडियाकडे मर्यादित पर्याय लक्षात घेता त्याला ब्रिस्बेन कसोटीत संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

14 / 17

रिषभ पंत ( Rishabh Pant) - सिडनी कसोटीचा सहनायक... रिषभ पंतच्या तडाखेबंद फटकेबाजीनं ऑस्ट्रेलियाचा घाम काढला होता. दुर्दैवानं शतकाच्या उंबरठ्यावरून त्याला ( ९७ धावा) माघारी परतावे लागले. या खेळीनं रिषभनं चौथ्या खेळीसाठी त्याचे स्थान पक्के केले आहे.

15 / 17

चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) - सिडनी कसोटी वाचवण्यात चेतेश्वर पुजाराचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यानं दोन्ही डावांत ( ५० व ७०) अर्धशतकी खेळी केली. मेलबर्नवर तो ( १७ व ३ धावा) अपयशी ठरला. पण, मधल्या फळीचा तो आधारस्तंभ आहे.

16 / 17

शुबमन गिल ( Shubman Gill) - पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल या जोडीला पहिल्या कसोटीत अपयश आल्यानंतर पृथ्वीच्या जागी शुबमनला संधी मिळाली. मेलबर्न कसोटीत त्यानं टीम इंडियात पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत चार डावांमध्ये ४५, ३५*, ५० व ३१ धावा करून संघातील स्थान पक्के केले आहे.

17 / 17

रोहित शर्मा ( Rohit Sharma) - इंडियन प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे, ट्वेंटी-20 मालिकेसह पहिल्या दोन कसोटी सामन्यांनाही मुकावे लागले होते. पण, सिडनी कसोटीतून त्यानं संघात पुनरागमन केलं. त्यानं दोन डावांमध्ये अनुक्रमे २६ व ५२ धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माअजिंक्य रहाणेशुभमन गिलचेतेश्वर पुजारारिषभ पंतवृद्धिमान साहाआर अश्विनपृथ्वी शॉमयांक अग्रवालशार्दुल ठाकूर