Cricket Buzz»फोटो गॅलरी »India vs Australia : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेलेIndia vs Australia : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले By स्वदेश घाणेकर | Published: November 29, 2020 2:43 PMOpen in App1 / 10India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली. अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून देताना मजबूत पाया रचला. 2 / 10स्टीव्हन स्मिथ ( Steve Smith) आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी करून धावांचा डोंगर उभा केला. त्यात ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी म्हणजे सोने पे सुहागा....3 / 10वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. फिंचनं ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. फिंच व वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांचा भक्कम पाया रचला. 4 / 10त्यानंतर वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. स्मिथ व लाबुशेन यांनी मधल्या षटकांत केलेली खेळी मंत्रमुग्ध करणारी ठरली. 5 / 10क्षेत्ररक्षण लांब असताना गॅप काढून कसे चौकार मारायचे, हे स्मिथनं आज शिकवले. त्यानं पुन्हा ६२ चेंडूंत शतक पूर्ण केलं. पण, ६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकार खेचून तो १०४ धावांवर बाद झाला. 6 / 10ग्लेन मॅक्सवेलची चौकार-षटकाराच्या आतषबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी हतबल केलं. कशीही गोलंदाजी करा मॅक्सवेलनं अतरंगी फटक्यानं सडेतोड उत्तर दिले. लाबुशेन ६१ चेंडूंत ७० धावा करून माघारी परतला. मॅक्सवेलनं २९ चेंडूंत नाबाद ६३ धावा केल्या. ऑस्टेलियानं ४ बाद ३८९ धावा चोपल्या. 7 / 10प्रत्युत्तरात मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु जोश हेझलवूड पुन्हा एकदा कर्दनकाळ ठरला. त्यानं ५८ धावांची ही भागीदारी तोडताना धवनला ( ३०) बाद केले. अग्रवालही ( २८) पुढच्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला.8 / 10दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मांडीच्या दुखापतीमुळे मैदान सोडले. ग्लेन मॅक्सवेलनं त्याला खांद्याचा सहारा देताना मैदानाबाहेर नेलं. त्यानंतर त्वरीत वॉर्नर गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग केले जाणार आहे. 9 / 10वॉर्नरच्या दुखापतीमुळे तो कसोटी ट्वेंटी-20 व कसोटी मालिकेला मुकण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का असेल. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications