Join us  

IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 6:04 PM

Open in App
1 / 6

Virat Kohli Records, IND vs BAN Test: भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेच्या माध्यमातून टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला ५ मोठे विक्रम खुणावत आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

2 / 6

निवृत्त न झालेल्या खेळाडूंमध्ये मायदेशात १२००० आंतरराष्ट्रीय धावा करण्याची संधी विराटकडे आहे. तो केवळ ११ धावा दूर आहे. आतापर्यंत सचिन तेंडुलकर (१४१९२), रिकी पॉन्टींग (१३११७), जॅक कॅलीस (१२३०५) आणि कुमार संगाकारा (१२०४३) या चौघांनी मायदेशात हा टप्पा गाठला आहे.

3 / 6

भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटींमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावे आहे. त्याने ४६८ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर ४३६ धावा असून त्याला अव्वल येण्यासाठी केवळ ३२ कसोटी धावांची गरज असणार आहे. पुजारा संघात नसल्याने हा टप्पा ओलांडणे कोहलीसाठी अवघड नाही.

4 / 6

ऑस्ट्रेलियन महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि भारताचा विराट कोहली या दोघांच्याही नावावर सध्या २९ कसोटी शतके आहेत. बांगलादेश विरूद्धच्या चार डावांमध्ये कोहलीने एक शतक ठोकले तरीही तो ब्रॅडमन यांना मागे टाकू शकेल. कसोटी शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे.

5 / 6

विराट कोहलीने ११३ कसोटींमध्ये ८,८४८ धावा केल्या आहेत. आगामी मालिकेत १५२ धावा केल्यास तो ९ हजार धावांचा टप्पा गाठेल. तसे झाल्यास सचिन तेंडुलकर (१५९२१), राहुल द्रविड (१३२६५) आणि सुनिल गावसकर (१०१२२) यांच्यानंतर ९००० कसोटी धावा करणारा तो चौथा भारतीय ठरेल.

6 / 6

विराट कोहलीकडे महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने केलेला एक महाकाय विक्रम मोडण्याची संधी आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटच्या ५९१ डावामध्ये मिळून एकूण २६,९४२ धावा केल्या आहेत. सर्वात जलद २७,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम सचिनच्या नावे (६२३ डाव) आहे. विराटने ५८ धावा केल्यास सचिनचा हा विक्रम विराट मोडू शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघसचिन तेंडुलकरबांगलादेशराहुल द्रविड