Cricket Buzz»फोटो गॅलरी »वीरू, विराटशी बरोबरी; रोहित शर्माचे विक्रम लै भारी!वीरू, विराटशी बरोबरी; रोहित शर्माचे विक्रम लै भारी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 11:37 AMOpen in App1 / 12भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रोहित शर्मा ( 85) आणि शिखर धवन (31) यांनी जोरदार फटकेबाजी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. 2 / 12या सामन्यात 'महा' चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण वादळ आणलं ते रोहितनं... त्याच्या दमदार फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांना पालापाचोळ्यासारखं भिरकावून दिलं. 3 / 12रोहित-धवननं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 11वेळा अर्धशतकी भागीदारी केली. या कामगिरीसह त्यांनी मार्टिन गुप्तील व केन विलियम्सन ( न्यूझीलंड) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 4 / 12बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहितनं ( 380+) स्वतःच्या नावावर केला. 5 / 12कॅलेंडर वर्षात २०००+ आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारताचा दुसरा सलामीवीर... यापूर्वी २००८ मध्ये वीरेंद्र सेहवागने अशी कामगिरी केली होती.6 / 12रोहित शर्माचे हे ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २२वे अर्धशतक ठरले आणि कर्णधार म्हणून त्याचे हे सहावे अर्धशतक ... यासह त्याने विराट कोहलीच्या दोन्ही विक्रमांशी बरोबरी केली...7 / 12एका वर्षांत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम... रोहितने २०१९ मध्ये ६५* आंतरराष्ट्रीय षटकार खेचले आहेत.. २०१८ मध्ये त्याने ७४, तर २०१७ मध्ये ६५ षटकार खेचले होते.8 / 12ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना भारताचा ४१ वा विजय ठरला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ४० आणि पाकिस्तानचा ३६ विजयांचा विक्रम मोडला..9 / 12ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 वेळा शतकी भागीदारीचा विक्रम रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं नावावर केला. त्यांनी डेव्हिड वॉर्नर- शेन वॉटसन, मार्टिन गुप्तील-केन विलियम्सन आणि रोहित-विराट कोहली यांचा ३ शतकी भागीदारीचा विक्रम मोडला.10 / 12रोहित शर्मानं एका ट्वेंटी-२० सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ८ वेळा मारले आहेत. या विक्रमात ख्रिस गेल व कॉलीन मुन्रो ( ९ ) संयुक्तपणे आघाडीवर आहेत.11 / 12आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक १० वेळा ७५+ धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर12 / 12रोहितनं या खेळीसह ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 2500 हून अधिक धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला. आणखी वाचा Subscribe to Notifications