India Vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध हे ५ खेळाडू निर्णायक ठरणार, टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवणार

Ind Vs Ban, T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ बुधवार २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळणार आहे. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आहे. या सामन्यात भारतीय संघातील ५ खेळाडू निर्णायक ठऱणार आहेत. त्यांनी करिश्मा दाखवल्यास या सामन्यात सहज विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी दावेदारी ठोकू शकतो. ते खेळाडू पुढीलप्रमाणे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ बुधवार २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळणार आहे. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आहे. या सामन्यात भारतीय संघातील ५ खेळाडू निर्णायक ठऱणार आहेत. त्यांनी करिश्मा दाखवल्यास या सामन्यात सहज विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी दावेदारी ठोकू शकतो. ते खेळाडू पुढीलप्रमाणे.

सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त अर्धशतके ठोकली होती. चौफेर फटकेबाजी करण्यात हातखंडा असलेला सूर्यकुमार बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो.

आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या शतकी खेळीनंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

भुवनेश्वर कुमार याने टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये जबरदस्त आणि किफायतशीर गोलंदाजी केली आहे. त्यामुळे झटपट विकेट्स मिळवण्यात इतर फलंदाजांना मदत झाली आहे. भुवनेश्वर कुमार टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज आहे.

गेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संघाबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याने अल्पावधीतच पुनरागमन केलं आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात छाप पाडली आहे. आता बांगलादेशविरुद्धही त्याच्याकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असेल.

अर्शदीप सिंहने टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ३ सामन्यात ७ बळी टिपले आहेत. तसेच त्याची गोलंदाजीही किफायतशीर झाली आहे. आता बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास तो उत्सुक असेल.