Join us  

India Vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध हे ५ खेळाडू निर्णायक ठरणार, टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:36 AM

Open in App
1 / 6

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ बुधवार २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळणार आहे. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आहे. या सामन्यात भारतीय संघातील ५ खेळाडू निर्णायक ठऱणार आहेत. त्यांनी करिश्मा दाखवल्यास या सामन्यात सहज विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी दावेदारी ठोकू शकतो. ते खेळाडू पुढीलप्रमाणे.

2 / 6

सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त अर्धशतके ठोकली होती. चौफेर फटकेबाजी करण्यात हातखंडा असलेला सूर्यकुमार बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो.

3 / 6

आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या शतकी खेळीनंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

4 / 6

भुवनेश्वर कुमार याने टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये जबरदस्त आणि किफायतशीर गोलंदाजी केली आहे. त्यामुळे झटपट विकेट्स मिळवण्यात इतर फलंदाजांना मदत झाली आहे. भुवनेश्वर कुमार टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज आहे.

5 / 6

गेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संघाबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याने अल्पावधीतच पुनरागमन केलं आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात छाप पाडली आहे. आता बांगलादेशविरुद्धही त्याच्याकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असेल.

6 / 6

अर्शदीप सिंहने टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ३ सामन्यात ७ बळी टिपले आहेत. तसेच त्याची गोलंदाजीही किफायतशीर झाली आहे. आता बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास तो उत्सुक असेल.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादव
Open in App