Join us  

India vs England 1st Test Live : जेम्स अँडरसननं काल सायंकाळी ६.५७ मिनिटाला सुरू केलेलं षटक आज दुपारी ३.३० वाजता पूर्ण झालं; पाहा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 4:13 PM

Open in App
1 / 10

India vs England 1st Test Live Cricket Score : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियानं मजबूत पकड घेतली आहे. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतानं ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल ( ५८*) आणि रिषभ पंत ( १३*) खिंड लढवत आहेत.

2 / 10

तिसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी ३.३० वाजता सुरू झाला, परंतु ११ चेंडू टाकल्यानंतर पावसाच्या आगमनामुळे सामना पुन्हा थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन यानं दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५७ मिनिटाला सुरू केलेलं षटक पूर्ण केलं.

3 / 10

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील कदाचित एक षटक पूर्ण होण्यासाठी लागलेला हा सर्वाधिक काळ असेल. पण असं का घडलं?

4 / 10

भारतीय गोलंदाजांनी यजमानांचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर रोहित व लोकेश यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, जेम्स अँडरसनच्या एका षटकानं टीम इंडियाच्या गोटात भीतीचा गोळा टाकला. उप कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला अन् आता टीम इंडियाची भिस्त लोकेश व रिषभ पंत यांच्यावर आहे.

5 / 10

कर्णधार जो रूट ( ६४) वगळल्यास इंग्लंडचे अन्य फलंदाज भारतासमोर नांगी टेकून माघारी परतले. जसप्रीत बुमराह ( ४) , शार्दूल ठाकूर ( २ ) , मोहम्मद सिराज ( १ ) व मोहम्मद शमी ( ३ ) यांनी इंग्लंडला धक्के दिले. रुटनं १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. सॅम कुरननं फटकेबाजी करताना नाबाद २७ धावा काढल्या. बुमराहनं इंग्लंडची अखेरची विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गडगडला.

6 / 10

रोहित व लोकेश यांनी पहिल्या विकेटसाठी ३७.३ षटकं खेळून काढताना ९७ धावांची भागीदारी केली. ऑली रॉबिन्सननं ही जोडी तोडली. त्यानं रोहित शर्माला ( ३६ धावा, १०७ चेंडू) माघारी पाठवले. त्यानंतर अँडरसननं ४१व्या षटकात टीम इंडियाला सलग दोन धक्के दिले.

7 / 10

चेतेश्वर पुजारा ( ४)ला यष्टिरक्षक जोस बटलरकरवी बाद केल्यानंतर कर्णधार विराटलाही त्यानं गोल्डन डकवर माघारी जाण्यास भाग पाडले. दरम्यान लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले, परंतु अजिंक्य रहाणे (५) एकदा वाचूनही दुसऱ्यांदा धावबाद होऊन माघारी परतला.

8 / 10

जेम्स अँडरसननं दुसऱ्या दिवशी ४७वे ( वैयक्तिक १४ वे) षटक टाकण्यास सुरूवात केली. ६.५७ला पहिला चेंडू टाकल्यानंतर पावसाचे आगमन झाले अन् दुसरा चेंडू टाकण्यासाठी अँडरसनला रात्री ८.४५ पर्यंतची वाट पाहावी लागली.

9 / 10

षटकातील तिसरा व चौथा चेंडू अँडरसननं रात्री ९.३० ला फेकला अन् पुन्हा पाऊस आल्यानं दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. आज तिसरा दिवसाचा खेळ दुपारी ३.३० वाजता सुरू झाला अन् अँडरसननं उर्वरीत दोन चेंडू टाकून षटक पूर्ण केल.

10 / 10

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनलोकेश राहुलरिषभ पंत
Open in App