India vs England 2nd Test Live: सहाव्या शतकासोबत लोकेश राहुलने ठोकला विक्रमांचा षटकार, नोंदवले हे खास रेकॉर्ड

India vs England 2nd Test Live Cricket Score : भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने फटकावलेले नाबाद शतक हे भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. या शतकी खेळीदरम्यान, लोकेश राहुलने अनेक विक्रमांची नोंद केली आहे, ते विक्रम पुढीलप्रमाणे. Eng vs ind 2nd test live score

ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर गुरुवारपासून भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. लोकेश राहुलचे शतक, रोहित शर्माचे अर्धशतक आणि विराट कोहलीच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ३ बाद २७६ धावा कुटल्या आहेत. भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने फटकावलेले नाबाद शतक हे भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. या शतकी खेळीदरम्यान, लोकेश राहुलने अनेक विक्रमांची नोंद केली आहे, ते विक्रम पुढीलप्रमाणे.

लोकेश राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठोकले. आता सर्वाधिक कसोटी शतके फटकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल २४ व्या स्थानावर पोहोचला आहे. एमएस धोनी आणि मन्सूर अली खान पतौडी यांनीही प्रत्येकी सहा शतके फटकावली आहेत.

लोकेश राहुलने रोहिल शर्मासोबत १२६ धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. लॉर्ड्सवर कुठल्याही भारतीय फलंदाजाने एकाच सामन्यात दोन शतकी भागीदाऱ्या करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लोकेश राहुलचे परदेशामध्ये सलामीवीर म्हणून चौथ्यांदा शतक ठोकले आहे. आशिया खंडाबाहेर त्याच्यापेक्षा अधिक शतके केवळ सुनील गावस्कर (१५) यांनीच फटकावली आहेत. तर वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनीही आशिया खंडाबाहेर सलामीला येऊन चार शतके फटकावली आहेत.

.लोकेश राहुल हा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक फटकावणारा दहावा भारतीय फलंदाज आहे. दिलीप वेंगसरकर यांनी या मैदानावर सर्वाधिक ३ शतके फटकावली आहेत. तर सौरव गांगुली, राहुल द्रविड, अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकर यांनीही येथे शतके फटकावली आहेत.

लोकेश राहुल लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक फटकावणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. तत्पूर्वी विनू मांकड आणि रवी शास्त्री यांनी सलामीला येऊन लॉर्ड्सवर शतकी खेळी केली आहे. राहुल १२७ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे लॉर्ड्सवर भारताकडून सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याची संधी त्याच्याकडे आहे. सध्या हा रेकॉर्ड विनू मांकड यांच्या नावावर आहे.

शतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने आपला पहिला चौकार १०८ व्या चेंडूवर लगावला होता. तत्पूर्वीच्या १०७ चेंडूत त्याने केवळ २२ धावा काढल्या होत्या. त्यानंतर त्याने मोईन अलीच्या चेंडूवर चौकार मारला.