MS Dhoni IND vs ENG: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये धोनी गुरूजींची 'सरप्राईज एन्ट्री' अन् मग...

धोनीने दोन दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये साजरा केला वाढदिवस

MS Dhoni IND vs ENG 2nd T20: भारतीय संघाचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. धोनीने भारतीय संघाला अनेक मानाच्या ट्रॉफी जिंकून दिल्या.

दोन दिवसापूर्वीच धोनीने इंग्लंडमध्ये आपल्या मित्र-परिवारासोबत वाढदिवस साजरा केला. त्यावेळी रिषभ पंतदेखील त्यासोबत होता. इंग्लंडमध्ये असलेला धोनी भारतीय संघाला भेटल्याशिवाय कसा राहिल...

इंग्लंड विरूद्धची दुसरी टी२० सुरू असताना धोनीने थेट भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सरप्राईज एन्ट्री मारली.

कालच्या सामन्यासाठी इशान किशनला विश्रांती देण्यात आली होती. तसेच आणखीही काही खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये होते. या साऱ्यांशी धोनीने मनसोक्त गप्पा मारल्या.

धोनी गुरूजी देत असलेल्या टिप्स ऐकण्यासाठी त्याच्याभोवती सारेच खेळाडू जमले. बीसीसीआयने देखील हे फोटो ट्वीट करत धोनीचे मार्गदर्शन कायमच महत्त्वाचे असते असे कॅप्शन लिहीले.

सर्व फोटो- बीसीसीआय ट्विटर आणि सोशल मीडिया