Join us  

India vs England 2nd Test : १६ फलंदाजांनी कसोटीत ९००० धावा केल्या, पण जो रूट त्यांच्यात 'उजवा' ठरला; पाहा भन्नाट स्टॅट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 7:40 PM

Open in App
1 / 9

India vs England 2021 2nd test match live cricket score : जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. बेअरस्टो आणि रूट यांनी १२१ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या धावफलकात महत्त्वाची भर घातली. बेअरस्टो माघारी परतल्यानंतर रूटनं शतक पूर्ण करून टीम इंडियासमोर अडचण निर्माण केली.

2 / 9

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचे लॉर्ड्सवर शतक, कसोटी क्रिकेटमधील २२ वे, तर २०२१मधील पाचवे शतक ठरले. यासह त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा पल्ला पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी अॅलिस्टर कूकनं हा पराक्रम केला आहे.

3 / 9

भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला धक्के बसले, परंतु रूट खचला नाही आणि त्यानं दमदार खेळ केला. रोरी बर्न्स-रूट यांनी १६४ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला, परंतु बर्न्स १३६ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर पायचीत झाला.

4 / 9

रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बेअरस्टो ५७ धावांवर माघारी परतला अन् रूटसोबतची १२१ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.

5 / 9

लॉर्ड्सवरील रूटचे हे दुसरे कसोटी शतक आहे. यासह त्यानं लेन हटन व ग्रॅमी स्मिथ यांच्याशी बरोबरी केली. मायकेल वॉन यानं सर्वाधिक ४ व ग्रॅहम गूच यांनी ३ शतकं लॉर्ड्सवर झळकावली आहेत.

6 / 9

इंग्लंडकडून १६ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. अॅलिस्टर कूक १५७३७, केव्हीन पीटरसन १३७७९ आणि इयान बेल १३३३१ हे रूटनंतर सर्वाधिक धावा करणारे इंग्लंडचे फलंदाज आहे.

7 / 9

भारताविरुद्ध सर्वाधिक १० शतकं करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला. कूकनं ८, पीटरननं ७ आणि इयान बेल व ग्रॅहम गूच यांनी प्रत्येकी ६ शतकं झळकावली आहेत.

8 / 9

कर्णधार म्हणून रूटचे हे कसोटीतील ११वे शतक आहे. यासह त्यानं ग्रॅहम गूच यांच्याशी बरोबरी, तर पीटर मे ( १०) यांचा विक्रम मोडला. अॅलेस्टर कूक १२ शतकांसह आघाडीवर आहे.

9 / 9

कसोटी क्रिकेटमध्ये १६ फलंदाजांनी ९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत, परंतु ९ वर्षांपेक्षा कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्यानं डिसेंबर २०१२मध्ये कसोटीत पदार्पण केले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट
Open in App