1. तीन शतके : भारताचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांना लॉर्ड्सचे ' लॉर्ड ' म्हटले जाते. कारण ज्या मैदानात सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांना एकही शतक झळकावता आले नाही त्या लॉर्ड्सवर वेंगसरकर यांनी तब्बल तीन शतके लगावली आहेत.
2. अष्टपैलू नजाकत : भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी लॉर्ड्सवर नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरी केली आहे. या मैदानात 1952 साली झालेल्या सामन्यात मंकड यांनी अर्धशतक, शतक आणि पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता.
3. धडाकेबाज फलंदाजी : लॉर्ड्सवर इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम गूच यांनी धडाकेबाज फलंदाजी केली होती. या मैदानात गूच यांनी 21 सामन्यांमध्ये सहा शतके आणि पाच अर्धशतकांच्या जोरावर दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
4. शतकासह सात बळींची किमया : इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक मॅट प्रायरने या मैदानात शतकासह सात बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. 2012 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रायरने शतकासह यष्ट्यांमागे आठ बळी मिळवले होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध 2014 सालीही त्याने शतक आणि सात बळी मिळवले होते.