Join us  

India vs England, 2nd Test : पिवळं जॅकेट, डोळ्यावर गॉगल; चेन्नई कसोटीत सर्वांचे लक्ष वेधणारी 'ती' कोण?

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 10:44 AM

Open in App
1 / 13

भारतीय संघानं आजच्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) आराम देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. शाहबाज नदीम याला वगळून अक्षर पटेल ( Axar Patel) याला पदार्पणाची संधी दिली आहे. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यालाही विश्रांती देऊन कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

2 / 13

शुबमन गिल बाद झाला असला तरी रोहित शर्मा ( Rohit Sharma) फॉर्मात परतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोहित चौकार-षटकाराची टोलेबाजी करत आहे आणि त्याची पत्नी रितिका सजदेह त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियवर उपस्थित आहे. रोहित व चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

3 / 13

रोहित शर्माची फटकेबाजी पाहून चाहत्यांसोबत कर्णधार विराट कोहलीही भलताच खूश झालेला पाहायला मिळत आहे. रोहितच्या फटकेबाजीवर विराटही प्रेक्षकांसोबत टाळ्या वाजवत आहे.

4 / 13

आजच्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश देण्यात आल्यानं टीम इंडियाला १२व्या खेळाडूची उणीव जाणवत नाही. पण, या सामन्यात पिवळं जॅकेट अन् गॉगल घातलेल्या एका तरुणीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कोण आहे ती?

5 / 13

पेव्हेलियन टॅरेस येथे बसून मॅच पाहणारी मी एकमेव मुलगी आहे. पण, मला स्कोअरबोर्ड दिसत नाही, असं तिनं केलेलं ट्विटही व्हायरल होत आहे. प्रिथी अश्विन असं तिचं नाव असून ती फिरकीपटू आर अश्विन याची पत्नी आहे.

6 / 13

प्रिथी ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही अश्विनसोबत गेली होती आणि सोशल मीडियावर ती मॅचबाबत व अश्विनच्या दुखापतीबाबत सातत्यानं अपडेट्स देत होती. अश्विन वेदनेनं किती विव्हळत होता, हे तिच्या ट्विटनं जगाला समजलं आणि तरीही अश्विननं मेलबर्न कसोटीत हनुमा विहारीसह टीम इंडियाचा पराभव टाळला.

7 / 13

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या प्रिथीला पाहून फॅन्सही खूश झाले. १३ नोव्हेंबर २०११मध्ये अश्विननं बालपणीची मैत्रिण प्रिथी नारायणन हिच्याशी लग्न केलं. ११ जुलै २०१५मध्ये दोघं पहिल्यांदा आई-बाबा झाले. २०१६मध्ये त्यांच्या घरी दुसरी नन्ही परी आली. अखिरा व आध्या असे अश्विनच्या दोन्ही मुलींची नावं आहेत.

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलरोहित शर्माचेतेश्वर पुजाराआर अश्विन