Join us  

India vs England, 2nd Test : ब्रिस्बेनमध्ये मिळवून दिला विजय, चेन्नईत वाचवली लाज; तरीही दुसऱ्या कसोटीतून संकटमोचक खेळाडूला डच्चू

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 10:03 AM

Open in App
1 / 8

भारतात पहिलीच कसोटी खेळणाऱ्या ऑली स्टोन ( Olly Stone) यानं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला धक्का दिला. शुबमन गिल ( Shubman Gill) भोपळा न फोडताच माघारी परतला.

2 / 8

भारतीय संघानं आजच्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) आराम देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. शाहबाज नदीम याला वगळून अक्षर पटेल ( Axar Patel) याला पदार्पणाची संधी दिली आहे.

3 / 8

आजच्या सामन्यातील तिसरा बदल हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. ज्या खेळाडूनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ब्रिस्बेन कसोटीपासून संकटमोचकाची भूमिका पार पाडत आहे. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) याच्याबद्दल आपण बोलत आहोत.

4 / 8

वॉशिंग्टन सुंदर याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) संधी मिळाली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर कुलदीप कसोटी संघात पुनरागमन करत आहे.

5 / 8

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटीत यजमानांनी ३६९ धावा केल्या होत्या. वॉशिंग्टननं पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या होत्या. पण, टीम इंडियाचा डाव ६ बाद १८६ असा गडगडला. सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी दमदार खेळ करताना संघाला ३३६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

6 / 8

सुंदरनं या सामन्यात १४४ चेंडूंत ६२ धावाही केल्या. दुसऱ्या डावात त्यानं एक विकेटही घेतली आणि २९ चेंडूंत २२ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला.

7 / 8

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सुंदरनं १३८ चेंडूंत नाबाद ८५ धावा करून संघाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानं या खेळीत १२ चौकार व २ षटकार खेचले.

8 / 8

टीम इंडिया ( Team India's playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडवॉशिंग्टन सुंदरकुलदीप यादवजसप्रित बुमराहमोहम्मद सिराज