यशस्वी जैस्वालचा भीमपराक्रम! १९७८नंतर असा विक्रम प्रथमच झाला, ब्रॅडमन यांच्या पंक्तित स्थान

India vs England 4th Test Live Update Marathi News : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४ विकेट्स गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पुन्हा एकदा उपयुक्त खेळी करताना भारताचा डाव सावरला आणि विक्रमांना गवसणी घातली. भारताने ५ बाद १६२ धावा केल्या आहेत. यशस्वी ७३ धावांवर ( ११७ चेंडू, ८ चौकार व १ षटकार) त्रिफळाचीत झाला.

भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात रोहित शर्मा २ धावांवर माघारी परतला. जेम्स अँडरसनने ४ धावांवर पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या शुबमनसह सलामीवीर यशस्वीने भारताला पुन्हा ट्रॅकवर आणले. शुबमनही चांगले फटके मारताना दिसला आणि त्याने यशस्वीसह १३१ चेंडूंत ८२ धावा जोडल्या. शोएब बशीरने ही जोडी तोडताना गिलला ( ३८) पायचीत केले.

रजत पाटीदार आज सावध खेळताना दिसला, परंतु बशीरने त्यालाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले. याहीवेळेस अम्पायर कॉलने इंग्लंडच्या बाजूने निकाल लावला. मागील सामन्यातील शतकवीर रवींद्र जडेजा ( १२) यालाही बशीरने माघारी पाठवून भारताला चौथा धक्का दिला.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ६०० हून अधिक धावा करणारा यशस्वी जैस्वाल तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी राहुल द्रविड ( २००२) आणि विराट कोहली ( २०१७) यांनी हा टप्पा ओलांडला होता.

२३ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एका कसोटी मालिकेत ६००+ धावा करणारा यशस्वी जैस्वाल सातवा फलंदाज ठरला. सर डॉन ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये इंग्लंडविरुद्ध ९७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर गॅरी सोबर्स ( ८२४ वि. पाकिस्तान), सुनील गावस्कर ( ७७४ वि. वेस्ट इंडिज), ग्रॅमी स्मिथ ( ७१४ वि. इंग्लंड). जॉर्ड हार्डली ( ७०३ वि. इंग्लंड) आणि एन हार्वी ( ६६० वि. दक्षिण आफ्रिका) यांनी हा पराक्रम केला आहे.

कसोटी क्रिकेटच्या मागील १३ वर्षांत एकाच मालिकेत ६०० हून अधिक धावा करणारा यशस्वी जैस्वाल पहिला सलामीवीर ठरला. यापूर्वी एलिस्टर कूकने ७६६ ( अॅशेस, २०१०-११) धावा केल्या होत्या

यशस्वी जैस्वालने या मालिकेत ६०१* धावा केल्या आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर एकाच कसोटी मालिकेत हा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला. गावस्कर यांनी १९७१ व १९७८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अनुक्रमे ७७४ व ७३२ धावा केल्या होत्या. या दोघांशिवाय विराट कोहली ( दोनवेळा), राहुल द्रविड ( तीनवेळा) आणि दीलिप सरदेसाई यांनी एका मालिकेत ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.

भारतात एका कसोटीत सर्वाधिक धावांचा विराट कोहलीचा ( ६१० वि. श्रीलंका, २०१७) विक्रम यशस्वी जैस्वालने ( ६१८) मोडला. सुनील गावस्कर ( ७३२ वि. वेस्ट इंडिज, १९७८) आणि विराट कोहली ( ६५५ वि. इंग्लंड, २०१६) हे आघाडीवर आहेत.