Join us  

India vs England : पहिली कसोटी ठरणार खास, बनू शकतात हे मोठे रेकॉर्ड्स

By बाळकृष्ण परब | Published: February 05, 2021 7:02 AM

Open in App
1 / 6

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. हा पहिलाच सामना अनेक कारणांनी खास ठरणार आहे. तसेच या लढतीत अनेक मोठे विक्रम नोंदवले जाण्याची शक्यता आहे. अशाच काही विक्रमांचा घेतलेला हा आढावा

2 / 6

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत १२२ कसोटी सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी २६ सामने भारताने तर ४७ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर ४९ सामना अनिर्णित राहिले आहेत. भारतात खेळवल्या गेलेल्या ६० सामन्यांपैकी १९ सामन्यात भारत तर १३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. चेन्नईत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये भारताने पाच तर इंग्लंडने तीन विजय मिळवले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

3 / 6

भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आज संघात स्थान मिळाल्याच त्याचा भारतीय भूमीवरील पहिलाच कसोटी सामना खेळेल. बुमराहने आतापर्यंत १७ कसोटी सामने खेळले आहेत. हे सर्व सामने त्याने परदेशात खेळले आहेत.

4 / 6

भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा कसोटी क्रिकेटमधील आपल्या तीनशे बळींपासून केवळ तीन बळी दूर आहे. इशांतने आतापर्यंत ९७ कसोटी सामन्यांत २९७ बळी टिपले आहेत. या कसोटीत तीन बळी टिपल्यास त्याचे बळींचे त्रिशतक पूर्ण होईल.

5 / 6

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चेन्नई कसोटी ही इंग्लिश कप्तान जो रूटची १००वी कसोटी ठरणार आहे. रूटने हा मान केवळ ३० वर्षांच्या वयात मिळवणार आहे. असे करणारा तो अॅलिस्टर कूकनंतरचा दुसरा इंग्लिश खेळाडू ठरणार आहे.

6 / 6

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने २०१८ पासून आतापर्यंत सातत्यपूर्ण खेळ केला आहे. २०१८ पासून आतापर्यंत स्टोक्सने ४०.८० च्या सरासरीने १९९९ धावा आणि ६३ बळी टिपले आहे. यादरम्यान, केवळ रवींद्र जडेजाची सरासरी स्टोक्सपेक्षा अधिक आणि गोलंदाजीची सरासरी ३० पेक्षा कमी राहिली आहे. या काळात जडेजाने १६ कसोटीत ५५.५७ च्या सरासरीने ७७८ धावा आणि २६.०७ च्या सरासरीने ५५ बळी टिपले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहइशांत शर्माजो रूटबेन स्टोक्स