Join us  

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियामध्ये पंत, सॅमसन आणि किशन, अशी असेल प्लेइंग-11

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 9:56 AM

Open in App
1 / 11

T20 विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत आपली कामगीरी दाखवण्यासाठी तयार आहे. भारतीय संघाने गेल्या दोन वर्षांत टी-२० फॉरमॅटमध्ये दोन विश्वचषक खेळले आहेत. 2021 साली UAE मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. आता ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात उपांत्य फेरीत दहा गडी राखून पराभूत होऊन जेतेपद पटकावण्यापासून संघ वंचित राहिला.

2 / 11

टीम चांगली खेळी दाखवण्यात अपयशी ठरली. गेल्या नऊ वर्षांपासून संघाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. पुढील T20 विश्वचषक अजून दोन वर्षे बाकी असताना,टीममध्ये तरुणांना संधी देण्यासाठी पुरेसा वेळ आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

3 / 11

खेळाची गरज लक्षात घेता T20 स्पर्धेत व्यवस्थापन फक्त विशेष क्रिकेटपटूंनाच स्थान देवू शकते, असं प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण याने सूचित केले आहे. पुढील वर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता फोकस बदलू शकतो. भारतीय संघ येथे तीन T20 सामने खेळणार आहे आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आणखी नऊ सामने खेळणार आहे.

4 / 11

ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये होता पण कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर केएल राहुल यांनी पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये चांगली खेळी न केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.

5 / 11

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात इशान किशन आणि शुभमन गिल सलामीला जाऊ शकतात पण व्यवस्थापन ऋषभ पंतला क्रमवारीत आणखी एक संधी देऊ शकते. चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत स्टार म्हणून उदयास आलेल्या शुभमनला येथे T20 पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

6 / 11

गेल्या 12 महिन्यांत इशानला क्रमवारीत अव्वल स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अधिक चांगल्या कामगिरीने तो सलामीवीर म्हणून आपला दावा आणखी मजबूत करू शकतो. संजू सॅमसनला त्याची योग्यता सिद्ध करण्याची आणखी एक संधी आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून तंदुरुस्त झाल्यानंतर या मालिकेत पुनरागमन करेल. तो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी दाखवू शकतो.

7 / 11

मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंना विकेट घेता न आल्याने टी-20मध्येही भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. या मालिकेत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी पुन्हा दिसू शकते. चहलला टी-20 विश्वचषकात संधी न दिल्याने बरीच टीका झाली होती.

8 / 11

जसप्रीत बुमराहसोबत सलामीसाठी भारताला आणखी एका वेगवान गोलंदाजाची गरज आहे. त्याला जम्मूचा उमरान मलिक प्रबळ दावेदार ठरू शकतो. उमरानने आयर्लंड आणि इंग्लंडच्या पहिल्या दौऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही.

9 / 11

दुसरीकडे केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. T20 विश्वचषकात विल्यमसनच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले होते.

10 / 11

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), केन विल्यमसन (c), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

11 / 11

टीम इंडिया: शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा/वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

टॅग्स :ऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्यान्यूझीलंड
Open in App