Cricket Buzz»फोटो गॅलरी »टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला! By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 12:15 PMOpen in App1 / 15भारतीय संघाचा पहिला डाव 242 धावांवर गुंडाळून न्यूझीलंडच्या सलामीवीर टॉम ब्लंडल आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या दिवसअखेर बिनबाद 63 धावा करताना चांगली सुरुवात केली.2 / 15पण, दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या उमेश यादवनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.3 / 15उमेश यादवनं टाकलेल्या 26व्या षटकात किवी ओपनल ब्लंडल पायचीत झाला. ब्लंडलनं 30 धावा केल्या.4 / 15त्यानंतर जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. त्याने किवी कर्णधार केन विलियम्सनला ( 3) रिषभ पंतकरवी झेलबाद केले.5 / 15आर अश्विनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजानं किवीच्या रॉस टेलरला ( 15) बाद करून टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर केला.6 / 15मोहम्मद शमीनं किवींना एकामागोमाग एक धक्के दिले. त्यानं सलामीवीर टॉम लॅथमला ( 52) आणि हेन्री निकोल्सला ( 14) बाद केले.7 / 15भारताच्या पहिल्या डावातील 242 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ 133 धावांत तंबूत परतला होता. त्यामुळे टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती.8 / 15लंचनंतर बुमराहनं किवींच्या बीजे वॉटलिंगला भोपळाही फोडू दिला नाही. टीम साऊदीही ( ०) त्याच षटकात बाद झाल्यानं किवींची अवस्था 7 बाद 153 अशी झाली होती.9 / 15पण, कॉलीन डी ग्रँडहोम, कायले जेमिसन आणि नील वॅगनर या तळाच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या मनसुब्यावर पाणी फिरवले.10 / 15रवींद्र जडेजानं कॉलीन डी ग्रँडहोमला बाद केले. पण, जेमिसन व वॅगनर यांनी 9व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करताना किवींना दोनशे धावांचा पल्ला सहज पार करून दिला.11 / 15जेमिसन व वॅगनर यांची अर्धशतकी भागीदारी सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर किवींनी पहिल्या डावात 235 धावा केल्या.12 / 15अवघ्या 7 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांना पुन्हा अपयश आले.13 / 15पृथ्वी शॉ ( 14), मयांक अग्रवाल ( 3), चेतेश्वर पुजारा ( 24), विराट कोहली ( 4) आणि अजिंक्य रहाणे ( 9) अवघ्या 84 धावांत माघारी परतले. 14 / 15नाइट वॉचमन उमेश यादव ( 1) बाद झाल्यानं टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर अवस्था 6 बाद 90 अशी झाली आहे. 15 / 15टीम इंडियाकडे 97 धावांची आघाडी आहे आणि रिषभ पंत व हनुमा विहारी यांच्या खांद्यावर आता संपूर्ण जबाबदारी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications