Cricket Buzz»फोटो गॅलरी »टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार! By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 10:18 AMOpen in App1 / 13न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं.2 / 13कसोटी मालिकेत तर टीम इंडियाला चार डावांमध्ये 250 धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. त्यापैकी तीन डावांत ( 165, 191, 242 आणि 124) टीम इंडिया दोनशे धावांच्या आत तंबूत परतली. 3 / 13रोहित शर्मा आणि शिखर धवन या नियमित सलामीवीरांची अनुपस्थिती ही संघासाठी चिंता होती. पण, त्यांना पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल आणि शुबमन गिल हे पर्याय होते. त्यापैकी योग्य निवड करणे गरजेचे होते.4 / 13मयांकची निवड ही अपेक्षित होतीच. पृथ्वी किंवा शुबमन यांच्यापैकी एक पर्याय निवडायचा होता. शुबमननं भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात दमदार कामगिरी करून त्याचा दावा सक्षम केला, पण पृथ्वीची लॉटरी लागली.5 / 13पृथ्वी आणि मयांक यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. त्यात मधल्या फळीनेही अपयशाचा पाढा गिरवला. पृथ्वी आणि मयांक यांना अनुक्रमे केवळ 98 आणि 102 धावाच करता आल्या.6 / 13मधल्या फळीतील सर्वात भरवशाचा फलंदाज विराट कोहलीही या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्याला चार डावांमध्ये केवळ 38 धावाच करता आल्या. 7 / 13चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाजांना किवी गोलंदाजांच्या रणनीतीवर मात करता आली नाही. दोघांनी अनुक्रे 100 आणि 91 धावा केल्या.8 / 13बराच काळ बाकावर बसून राहिलेल्या रिषभ पंतला या मालिकेतून आपले दमदार पुनरागमन करण्याची संधी होती. पण, न्यूझीलंडच्या बाऊंसरसमोर त्याचाही निभाव लागला नाही. 9 / 13हनुमा विहारीने संयमीपणा दाखवला, परंतु तोही मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला.10 / 13एकीकडे न्यूझीलंडचे गोलंदाज आग ओकत असताना भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. 11 / 13इशांत शर्माला झालेली दुखापत ही संघाची डोकेदुखी वाढवणारी ठरली. इशांतने एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.12 / 13जगातील सर्वात घातकी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून अजूनही नीट सावरलेला नाही. त्यामुळे त्याला खेळवण्याची घाई टीम इंडियाला महागात पडली. बुमराहला दोन सामन्यांत केवळ 6 विकेट घेता आल्या.13 / 13 आणखी वाचा Subscribe to Notifications