Join us  

IND Vs NZ, 2nd T20I: भारताच्या विजयाचे हायलाईट्स, एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 4:20 PM

Open in App
1 / 7

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं सुरेख सांघिक खेळ केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं सात विकेट राखून हा सामना जिंकला.

2 / 7

राहुलनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी मजबूत आघाडी घेतली आहे.

3 / 7

न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. पण, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी या दोघांनाही माघारी पाठवले.

4 / 7

त्यानंतर रवींद्र जडेजानं किवी कर्णधार केन विलियम्सन आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांना माघारी पाठवून धक्के दिले. त्यात जसप्रीत बुमराहनं टिच्चून मारा केला.

5 / 7

त्यामुळे किवींना 20 षटकांत 5 बाद 132 धावा करता आल्या. जडेजानं 4 षटकांत 18 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. ठाकूर, दुबे आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केले.

6 / 7

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( 8) आणि विराट कोहली ( 11) लगेच माघारी परतले. पण, लोकेश राहुलनं तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह 86 धावांची भागीदारी केली.

7 / 7

श्रेयस अय्यर 33चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून 44 धावांवर माघारी परतला. लोकेश राहुल 50 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 57 धावांवर नाबाद राहिला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडलोकेश राहुलविराट कोहलीरोहित शर्मारवींद्र जडेजाजसप्रित बुमराह