IND vs NZ live T20I : सूर्यकुमार यादवने केले अनेक पराक्रम; मोडले विराट, रोहित, युवराज यांचे विक्रम

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या १९१ धावांचा पाठलाग करताना किवींचा संपूर्ण संघ १२६ धावांत माघारी परतला. सूर्यकुमार यादव मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला.

सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) भारताच्या १९१ धावांपैकी १११ धावा चोपल्या. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे ट्वेंटी-२०तील दुसरे शतक ठरले आणि रोहित शर्मा ( १०२८) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.

इशान किशन ( ३६) व रिषभ पंत ( ६) यांना सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पून्हा संकटमोचक ठरला. त्याने ४९ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १११ धावा चोपल्या.

कर्णधार हार्दिक पांड्या ( १३) व श्रेयस अय्यर ( १३) यांनी सूर्यासोबत समाधानकारक भागीदारी केली. सूर्या व श्रेयस यांनी २१ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. हार्दिकने चौथ्या विकेटसाठी सूर्यासोबत ४० चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ७ मॅन ऑफ दी मॅच पटकावण्याच्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्या विक्रमाशी सूर्यकुमार यादवने बरोबरी केली. विराट कोहलीने २०१६ मध्ये सहा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकले होते.

सूर्यकुमारने आज अखेरच्या ५ षटकांत ६२ धावा चोपल्या आणि भारताकडून ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. विराट कोहलीने २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ६३ धावा चोपल्या होत्या, सूर्याने आज युवराज सिंगचा ५८ धावांचा ( वि. इंग्लंड, २००७) विक्रम मोडला.

कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २ शतक झळकावणारा सूर्या चौथा फलंदाज ठरला. कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड, २०१७), रोहित शर्मा ( भारत, २०१८) व रिली रोसोवू ( दक्षिण आफ्रिका, २०२२) यांनी हा पराक्रम केला आहे,