Cricket Buzz»फोटो गॅलरी »India vs Pakistan : भारताचा क्लिन स्विप ; पाकिस्तानला सातव्यांदा लोळवले!India vs Pakistan : भारताचा क्लिन स्विप ; पाकिस्तानला सातव्यांदा लोळवले! By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 10:51 AMOpen in App1 / 15भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयी परंपरा कायम राखली.2 / 15भारताने रविवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला.3 / 15हिटमॅन रोहित शर्माच्या दमदार १४० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ३३६ धावांचा डोंगर उभा केला.4 / 15शिखर धवनच्या अनुपस्थितील सलामीला आलेल्या लोकेश राहुलनेही ५७ धावांची खेळी केली.5 / 15रोहित व राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची विक्रमी भागीदारी केली.6 / 15वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.7 / 15कॅप्टन विराट कोहलीनेही ७७ धावांची जलद खेळी करत भीमपराक्रम नावावर केला.8 / 15वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११००० धावा करण्याचा विक्रम त्याने केला. त्याने २२२ डावांत हा पराक्रम केला.9 / 15धावांचा पाठलाग करताना पाचव्या षटकात विजय शंकरने पाकिस्तानला धक्का दिला.10 / 15फखर जमान व बाबर आजम यांनी शतकी भागीदारी करून पाकच्या आशा पल्लवीत केल्या.11 / 15कुलदीप यादवने या दोघांनाही माघारी पाठवून सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला.12 / 15त्यानंतर भारतीय गोलंदाज व पावसाच्या माऱ्याने पाकिस्तानला बेहाल केले.13 / 15पावसामुळे पाकिस्तानसमोर ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. 14 / 15पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ६ बाद २१२ धावा करता आल्या.15 / 15डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. आणखी वाचा Subscribe to Notifications